घरमनोरंजनऐश्वर्या राय बच्चन मुलीसह नानावटी रुग्णालयात दाखल

ऐश्वर्या राय बच्चन मुलीसह नानावटी रुग्णालयात दाखल

Subscribe

दोन दिवसांपूर्वीच या दोघींचीही कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती

अमिताभ – अभिषेक बच्चन नंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यासह तिच्या मुलीला आराध्या बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याला ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिला आणि तिच्या मुलीला म्हणजेच आराध्यालाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघींची गेल्या दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या संदर्भातील माहिती ANI या वृत्तसंस्थेने देखील दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, ११ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांनी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची त्यांनी माहिती दिली होती. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना १२ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अभिषेकनेही त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती.

१३ जुलै रोजी दोघींही कोरोना पॉझिटिव्ह 

त्यानंतर आता काही वेळापूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक ऐश्वर्याची मुलगी आराध्या या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर १३ जुलै रोजी या दोघींची कोरोना टेस्टही करण्यात आली होती आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पॉझिटिव्ह असल्याचे समजताच या दोघी होम क्वारंटाइन होत्या. मात्र आज ऐश्वर्याला ताप आल्याने दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच, १२ जुलै रोजी जेव्हा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा काही प्रसारमाध्यमांनी अशीही बातमी दिली होती की ऐश्वर्याची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र १३ जुलै रोजी ऐश्वर्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.


ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग; ट्विटरवर दिली माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -