मुंबईकरांच्या खिशाला लागणार कात्री

मुंबईकरांच्या खिशाला लागणार कात्री

टॅक्सी

लवकरच मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबईतील टॅक्सीचे सुरुवाती भाडे आता २२ रुपयांवरून २७ रुपये होणार आहे. या भाडेवाढीसाठी परिवहन विभाग तयारीला लागला आहे. मुंबई टॅक्सी युनियन आणि राज्य सरकार यांच्यात नुकतीच एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वाहतूक सचिव आणि परिवहन यांना एका आठवड्यात भाडेवाढीसंबंधी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

१ जून २०१९ रोजी टॅक्सीचालकांना दिड किलोमीटरसाठी किमान 30 रुपयांपर्यंत टॅक्सी भाडेवाढ द्यावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने परिवहन विभागाकडे केली आहे. सोबतच भाडेवाढ न मिळाल्यास संपाचा इशारा सुद्धा परिवहन विभागाला देण्यात आला होता. या मागणीवर परिवहन मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली. मंगळवारी मुंबई टॅक्सी युनियन आणि राज्य सरकार यांच्यात एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वाहतूक सचिव आशिष कुमार सिंह आणि परिवहन आयुक्त शेखर चैने यांना एका आठवड्यात भाडेवाढ संबंधित अडचणी दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासोबतच ग्राहक पंचायती सोबत बैठक घेऊन पुढच्या आठवड्यातील सोमवार पर्यंत भाडेवाडी निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार या पावसाळी अधिवेशनात रिक्षा -टॅक्सीचे भाडे वाढ करून देण्याच्या तयारीत आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष एंटोनी लॉरेंस क्वाड्रोस यांनी आपलं महानगरला सांगितले की, परिवहन मंत्री दिवाकर रावते टॅक्सीच्या भाडेवाढीबद्दल सकारात्मक आहे.

2O13 पासून भाडेवाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु त्याला विरोध करत काहींनी कोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर फक्त एक रुपया भाडेवाढ थेट 2015 मध्ये मिळाली. त्यामुळे टॅक्सीचे भाडे दिड किमी मागे 21 रुपयांवरुन 22 रुपये झाले होते. 2015 मध्ये वाढ मिळाल्यानंतर 2018 मध्ये 22 रुपयांवरुन थेट 25 रुपये भाडेवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता सतत इंधनदर वाढ बरोबर टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या अन्य खर्चातही वाढ होत असल्याने चालकाला ते परवडनासे झाले आहे. त्यामुळेच सुरुवातीला दिड किलोमीटरमागे किमान 30 रुपये टॅक्सीचे भाडे निश्चित करावे, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे कारण्यात आली होती. मात्र आता परिवहन मंत्र्याच्या विनंतीनुसार टॅक्सी युनियननी 30 रुपये वरून 27 रुपये बेस फेअर करण्यासाठी तयार झालेला आहे.

First Published on: June 21, 2019 4:51 AM
Exit mobile version