लालबाग गॅस सिलेंडर स्फोटातील जखमींची महापौरांनी केली विचारपूस

लालबाग गॅस सिलेंडर स्फोटातील जखमींची महापौरांनी केली विचारपूस

लालबाग गॅस सिलेंडर स्फोटातील जखमींची महापौरांनी केली विचारपूस

साराभाई बिल्डिंग गणेश गल्ली लालबाग येथील गॅस लालबाग गॅस सिलेंडर स्फोटातील जखमींची महापौरांनी विचारपूस केली.  दुर्घटनेतील जखमींची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी केईएम रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच जखमींवर तातडीने सर्वतोपरी उपचार करण्याचे निर्देश दिले. यावेळी आमदार अजय चौधरी, स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख,डॉ.बांगर उपस्थित होते.

केईएम रुग्णालयातील जखमींची विचारपूस केल्यानंतर महापौरांनी घटनास्थळाला सुद्धा भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ज्यांच्या घरी गॅस दुर्घटना झाली आहे त्यांच्याकडे लग्न विधी सुरू होते. अचानक गॅस लिकेज होत असल्याचे कळल्यानंतर घरातील सर्वांनी त्याकडे धाव घेतली. तेव्हा अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये सोळा जण जखमी झाले असून बारा जणांना केईएम रुग्णालयात तर चार जणांना मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.

केईएममध्ये युद्धपातळीवर सर्व जखमींवर उपचार सुरू असून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू न देता औषध उपचार करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच गॅस दुर्घटनेतील कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था लगतच्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. क्षतीग्रस्त झालेल्या घराची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.


हेही वाचा – प्रभादेवीत गॅस गळतीने खळबळ

First Published on: December 6, 2020 1:23 PM
Exit mobile version