‘औकात’ शब्द म्हणजे…; अमृता फडणवीस-चतुर्वेदी वादात अंधारेंनंतर टीएमसी खासदाराची उडी

‘औकात’ शब्द म्हणजे…; अमृता फडणवीस-चतुर्वेदी वादात अंधारेंनंतर टीएमसी खासदाराची उडी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायन विरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा गुरुवारी (१६ मार्च) विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. हा वाद विधानसभेत उपस्थित केल्यामुळे ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत अमृता फडणवीस यांन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु अमृता फडणवीस यांनी चतुर्वेदी यांचे ट्विट रिट्विट करत त्यांची औकात काढली. या दोघींच्या वादात ठाकरे गटाच्या सुषणा अंधारे यांच्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुओ मोईत्रा यांनी एंट्री घेतली आहे.

अमृता फडणवीसांनी यांनी प्रियंका चतुर्वेदींचे ट्विट रिट्विट करत म्हटले होते की, “मॅडम चतुर्वेदी, आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी अॅक्सिस बँकेला चुकीच्या पद्धतीने फायदे आणले आहेत आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात. अर्थात तुमचा विश्वास संपादन केल्यावर, जर कोणी पैश्यांची लाच देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याकडे संपर्क साधला असता, तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती, तीच तुमची औकात आहे.

यावर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यानंतर तृणमृल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करत प्रियंका चतुर्वेदींची बाजू घेतली आहे. मोईत्रा यांनी ट्विटरमध्ये म्हटले की, मी प्रियांकाशी सहमत आहे. काही स्त्रिया “औकत” सारख्या कमी बजेटच्या हिंदी चित्रपटातील डायलॉग वापरतात हे आश्चर्यकारक आहे!! मला असे म्हणायचे की हे वास्तविक जीवनातही असे शब्द वापरतात. औकात शब्द वापरणे म्हणजे किती लबाडपणा आहे, असा खोचक टोलाही मोईत्रा यांनी अमृता फडणवीस यांना लगावला.

“औकत” शब्दावर सुषमा अंधारे काय म्हणाल्या
अंधारेंनी ट्विटरमध्ये म्हटले की, #अमृतावहिनी बरोबर बोलतायत. खर तर खाली दिलेले फोटो बघून असे वाटते की आमची एवढी औकात कुठे की, आम्ही संपूर्ण पोलीस खाते आमच्या सेवेत तैनात करु. आमची एवढी औकात कुठे की, मुख्यमंत्री पदाचे सर्व प्रोटोकॉल तोडून आम्हीही त्यांच्या ताफ्यात सामील होऊ.
दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, आमची एवढी औकात कुठे आहे की, आम्ही एकाच वेळी गायक, मॉडेल, राजकारणी बनू आणि त्याच वेळी ट्विटही करत राहू. मग सामाजिक कार्याच्या नावाखाली चॅरिटी शो देखील करु आणि तिकीट विकण्यासाठी संपूर्ण पोलीस खात्याचाही वापर करु.
तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, आमची एवढी औकात कुठे की, आमच्या एका अर्जावर पोलिसांनी ताबडतोब आमची तक्रार घ्यावी आणि एफआयआर दाखल करून आमच्या इच्छेनुसार आरोपपत्र दाखल करावे. वहिनी आणि नंनद या नात्याने इतके लिहायची औकात आहे ना वहिनी? असा टोलाही सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे.

First Published on: March 17, 2023 6:16 PM
Exit mobile version