ऐकावं ते नवलच! पुरुषाच्या पोटातून काढलं गर्भाशय!

ऐकावं ते नवलच! पुरुषाच्या पोटातून काढलं गर्भाशय!

लग्नानंतर दोन वर्षांपासून मूल होत नाही म्हणून उपचार घेणाऱ्या मुंबईतील एका २९ वर्षीय व्यक्तीवर जे.जे हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या व्यक्तीच्या पोटातून गर्भाशय काढण्यात आलं आहे. जे.जे. हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. व्यकंट गिते आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली.

ही व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून वंधत्त निवारण्यासाठीचे उपचार जे.जे हॉस्पिटलमध्ये घेत होते. त्यांची सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या पोटात महिलेसारखं गर्भाशय आढळलं. अशा परिस्थितीमध्ये अंडाशयाला कर्करोग होण्याची २० टक्के शक्यता असते. त्यामुळे, या व्यक्तीचं सोनोग्राफी, एमआरआय केल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचं गर्भाशय काढून टाकण्यात आलं. तर, २६ तारखेला या व्यक्तीवर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यात त्याचे अंडाशय हे अंडकोषात सरकवण्यात आल्याची माहिती जे. जे. च्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. व्यकंट गिते यांनी दिली आहे.

शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स

अशी केली शस्त्रक्रिया –

अंडाशय हो पोटातच असून त्यांची अंडकोषापर्यंत वाढ झालेली नव्हती. त्या व्यक्तीच्या लिंगाची वाढ व्यवस्थित होती. पण, वीर्य तपासणीत शुक्राणू आढळले नाहीत. त्यानंतर या व्यक्तीला ‘ अनडिसेंडेड टेस्टीज ‘ चं निदान केलं. शस्त्रक्रियेदरम्यान या व्यक्तीच्या अंडाशयासोबत महिलांमध्ये आढळणारे गर्भाशयासारखे अवयव दिसून आले. त्यामुळे , या व्यक्तीची हार्मोनल, सिटीस्कॅन, एमआरआय आणि बायोप्सी तपासणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये ६ सेमीएवढे गर्भाशय इतर गर्भाशयाशी निगडीत असलेल्या अवयवासोबत होते. पुरुषांमध्ये गर्भाशय आढळणाऱ्या या निदानाला ” प्रायमरी मुल्येरीयन डक्ट सिंड्रोम-फिमेल” असं म्हणतात. यानंतर, रुग्णाचे अंडाशय हे अंडकोषात सरकण्यात आले. या शस्त्रक्रिया खूपच अवघड मानल्या जातात. तर, जगात अशा फक्त २०० केसेस आहेत. अशा रुग्णांना अंडाशयाचा कर्करोग होण्याची ही शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांचं लहानपणीच समुपदेशन करुन शस्त्रक्रिया केल्या गेल्या तर ते त्यांचं आयुष्य सुरळीत होऊ शकतं, असं मत डॉ. गीते यांनी व्यक्त केलं आहे.

कन्व्हर्जन शस्त्रक्रिया करणं शक्य पण…

अशा रुग्णांमध्ये कन्व्हर्जन शस्त्रक्रिया करता येते पण गर्भाशय प्रत्यारोपण तसंच गर्भ राहून अपत्य होणं अवघड असल्याचंही सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत फक्त दोन रुग्णांमध्ये यशस्वीरित्या पालकत्व सिद्ध झालं आहे.

हेही वाचा –

फिफा वुमन्स वर्ल्डकपचं गुगलने केलं सेलिब्रेशन

नाशकात उभारणार ३०३ फूट उंच ध्वजस्तंभ

First Published on: July 7, 2019 1:26 PM
Exit mobile version