वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या नवलकर कलादालनाची भिंत धोकादायक

वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या नवलकर कलादालनाची भिंत धोकादायक

प्रातिनिधीक फोटो

तब्बल एक वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या मलबार हिलमधील स्वर्गीय प्रमोद नवलकर कलादालनासाठी २० रुपयांचे प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. परंतु पर्यटकांकडून हे शुल्क आकारले जात असले तरी येथील संरक्षक भिंत जुनी झाली आहे. पर्यटकांसाठी हा धोका असून या भागाचे नुतनीकरण करताना झोपलेल्या महापालिका प्रशासनाला आता ही या संरक्षक भिंतीची डागडुजी करण्याचे सुचले आहे. त्यामुळे नवलकर गॅलरीला भेट देणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे.

वर्षांपूर्वी केलेल्या बांधकामाचा भाग खचला; काही ठिकाणी भेगा 

मलबार हिलमधील जुन्या नाझ हॉटेलच्या तसेच महापालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या इमारतीची पुनर्बांधणी करून त्याठिकाणी स्वर्गी प्रमोद नवलकर यांच्या स्मरणार्थ प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली. याठिकाणी सर्व प्रकारचे बांधकाम करत नुतनीकरण केलेल्या गॅलरीचे लोकार्पण १० ऑक्टोबर २०१८मध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याहस्ते झाले. एक वर्षांपूर्वी येथील सर्वप्रकारचे बांधकाम केलेले असतानाच गॅलरीच्या परिसरात भेगा तसेच काही भाग खचल्याचे आढळून आले. त्यानुसार येथील इमारतीच्या मागे असलेल्या जुन्या संरक्षक भिंतीचे संरचनात्मक लेखा परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट)करण्यासाठी सल्लागार म्हणून दिपक कुलकर्णी यांची एप्रिल २०१९मध्ये नेमणूक केली. त्या स्ट्रक्चरल ऑडीटनुसार ही संरक्षक भिंत धोकादायक असल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आल्याने गॅलरीच्या स्थैर्याच्या दृटीने तसेच भविष्यात कोणतीही दुघर्टना घडू नये. यामुळे मालमत्तेचे जिवित हानी होवून नये कोणतीही जिवीतहानी होवू नये म्हणून या भिंतीच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.


हेही वाचा- आरे मेट्रो कारशेड; दीड वर्षे बॅकफुटला

त्यानुसार कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून यावर सुमारे २ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी पात्र ठरलेल्या यु.के.कंस्ट्रक्शन या कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा २७ टक्के अधिक दराने बोली लावत हे काम मिळवले आहे. या कंपनीला भिंत बांधण्याचा कोणताही अधिकार नाही. आजवर या कंपनीने मलवाहिनी टाकणे व पेव्हरब्लॉक बसवण्याचे काम केले आहे. परंतु आचारसंहितेच्या कारणामुळे विरोधक आणि पहारेकर्‍यांनी तोंड गप्प ठेवल्याने शिवसेनेने हा प्रस्ताव मारुन नेत त्याला मंजुरी दिली. या कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रेक्षक गॅलरीच्या आवारात सिमेंट ग्राऊटींग करणे, संरक्षक भिंतीला शॉर्ट क्रीटींग करून तसेच त्यात रॉड अँकर बसवणे याशिवाय या भिंतीत विप होल्सची व्यवस्था करणे आदींचा समावेश आहे.

संरक्षक भिंतीबाबतचा मुद्दा ऐरणीवर

मालाड जलाशयाची भिंत कोसळून अनेक लोकांचे बळी गेले आहे.त्यामुळे डोंगरावर असलेल्या संरक्षक भिंतीबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या भिंतीच्या बांधकामांबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असताना मलबार हिलच्या या संरक्षक भिंतीचे काम अननुभवी कंत्राटदाराला देण्यात येत असल्याने गॅलरीत येणार्‍या पर्यटकांच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एक-दोन वर्षांपूर्वी केलेल्या कामांना भेगा पडल्याने हे काम निकृष्ठ आहे. त्यामुळे या गॅलरीचे काम करणार्‍या कंपनीविरोधात कारवाई करायला हवी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे

First Published on: September 16, 2019 9:40 AM
Exit mobile version