मुंबई लोकल ट्रेनमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दुप्पटीने वाढ

मुंबई लोकल ट्रेनमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दुप्पटीने वाढ

लोकल ट्रेनमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दुप्पटीने वाढ

लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफ लाईन मानली जाते. दररोज ८० लाखांपेक्षा जास्त प्रवासी या लोकल ट्रेनने प्रवास करतात. परंतु, गर्दीचा फायदा घेऊन चोरीदेखील येथे मोठ्या प्रमाणात होते. गेल्या सहा वर्षात उपनगरीय लोकलमध्ये चोरी होणाऱ्या घटनांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली असल्याची बाब एका माहिती अधिकारातून समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी लोहमार्ग पोलीस विभागाला यासंबंधीची माहिती विचारली होती. यावर लोह मार्ग पोलिसांनी माहिती दिली आहे. गेल्या सहा वर्षात उपनगरीय रेल्वे हद्दीत एकूण ३१६८ जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ६ कोटी, ९६ लाख, ४७ हजार, ७६७ रुपये किंमतीची मालमत्ता आणि रोख रकमेचा समावेश असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस विभागाने शकील यांना दिली आहे.

हेही वाचा – मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये मोबाईल चोरीत वाढ

५० टक्के रक्कम मिळाली

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी लोहमार्ग पोलीस विभागाकडे २०१३ पासून मे २०१८ पर्यंत मुंबईचे उपनगरीय रेल्वे हद्दीत किती जबरी चीरीचे गुन्हे नोंद झाले आहेत? किती गुन्ह्याची उघड झाली आहे? किती किंमतीची मालमत्ता किंवा रोख चोरी झाली आहे? पोलिसांनी किती किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत केले आहे? याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात लोहमार्ग पोलीस विभागाचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील भामरे यांनी शकील अहमद शेख यांना माहिती दिलेली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनिसार मुंबईत १ जानेवरी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ३१६८ जबरी चीरीचे गुन्हे नोंद झाले आहेत. सहा वर्षात ६ कोटी, ९६ लाख, ४७ हजार, ७६७ रुपये इतक्या किंमतीची मालमत्ता किंवा रोख चोरी झाली आहे. यामध्ये फक्त ३ कोटी ६४ लाख ६८ हजार ५४२ रुपये इतकी किंमतीची मालमत्ता किंवा रोख रक्कम मिळाली आहे. याचा अर्थ असा की, ५० टक्के मालमत्ता किंवा रोख रक्कम मिळाली आहे.

हेही वाचा – लोकल ट्रेनवर अज्ञातांची दगडफेक, महिला प्रवासी जखमी

वर्षाप्रमाणे गुन्ह्यांची नोंद

First Published on: April 10, 2019 3:20 PM
Exit mobile version