घरमुंबईमुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये मोबाईल चोरीत वाढ

मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये मोबाईल चोरीत वाढ

Subscribe

मुंबईसारख्या उपनगरात लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या मोबाईल चोरीमध्ये दिवसेदिवस वाढ होताना दिसत आहे. यासंबंधीची माहिती आरटीआय अधिकारी शकील अहमद यांनी समोर आणली आहे.

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये दररोज ८० लाखापेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून प्रवास करतात. या मुंबई उपनगरीय लोकल मध्ये ६ वर्षात एकूण ५९,९०४ मोबाईलची चोरीच्या घटना घडल्या आहे. बृहन्मुंबई पोलीस विभागांने ९९ कोटी ४६ लाख ९६ हजार ९८१ रूपये किंमतीच्या मोबाईल फोन चोरी झालेल्या घटनेची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना दिली.

२०१३ ते २०१८ चा अहवाल 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे १ जानेवारी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत उपनगरीय गाड्यांमध्ये ५९,९०४ मोबाईल चोरीची घटनेची नोंद झाली आहे. तसेच २०१३ ते २०१८ या सहा वर्षाच्या काळात ९९ कोटी ४६ लाख ९६ हजार ९८१ रूपये किंमतीच्या मोबाईल चोरी झाल्याची माहिती दिली. सध्या फक्त ८८६८ मोबाईल मिळाले असून फक्त १० टक्के चोरी झालेले फोन मिळाले आहेत. २०१३ मध्ये एकूण १०४५ मोबाईल चोरी झाले तर २०१४ मध्ये एकूण १५१८ मोबाईल चोरी झाले आहेत. २०१५ मध्ये एकूण २०९२ मोबाईल चोरी झाली असून २०१६ मध्ये एकूण २००९ मोबाईल चोरी झाले. २०१७ मध्ये एकूण २०७६४ मोबाईल चोरी आणि २०१८ मध्ये एकूण ३२४७६ मोबाईल चोरी असून २५१७ मोबाईल फोन मिळाले.

- Advertisement -

मोबाईल फोन्सच्या संख्येत वाढ

२०१३ पासून २०१६ पर्यंत ६ हजार ६६४ मोबाईल फोन चोरी झाले आहे. तसेच, २०१७ पासून २०१८ पर्यंत उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या मोबाईल फोन्सच्या संख्येत वाढ होऊन ५३ हजार २४० मोबाईल चोरी आहे. दिवसेदिवस उपनगरीय रेल्वे गाड्यामधून मोबाईल चोरी होण्याची घटनेत वाढ होत आहे. मुंबईचे उपनगरीय गाड्यांमध्ये २०१३ च्या तुलनेत २०१८ मध्ये मोबाइल चोरीच्या घटनेत ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मागवलेल्या माहितीनुसार मुंबईत आंतरराष्ट्रीय गँगकडून मोबाईल फोनची चोरी केली जाते आणि नेपाळसारख्या देशात त्या मोबाईल फोन्सची सर्रास विक्री केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -