गोळीबार करून ज्वेलर्स दुकानावर दरोडा; ३० तोळ्यांची लूट, ३ जण जखमी

गोळीबार करून ज्वेलर्स दुकानावर दरोडा; ३० तोळ्यांची लूट, ३ जण जखमी

अंबरनाथमध्ये गोळीबार करून ज्वेलर्स दुकानावर दरोडा; ३० तोळ्यांची लूट, ३ जण जखमी

अंबरनाथ सर्वोदय मार्केटमध्ये असलेल्या भवानी ज्वेलर्समध्ये भरदिवसा दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार दरोडेखोरानी गोळीबार करून दरोडा टाकून पळ काढल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. या दरोड्यात २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहे. बोईसर, मिरारोड,अंबरनाथ येथे एकापाठोपाठ एक, असे तीन ज्वेलर्स दुकानावर पडलेल्या दरोड्यामुळे ज्वेलर्स दुकानदारामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील सर्वोदय मार्केट या ठिकाणी भवानी ज्वेलर्स हे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार शस्त्रधारी दरोडेखोरांनी दुकानात घुसून हवेत गोळीबार करून लूटमार सुरू केली. दुकानातील दागिने लुटून पळ काढत असताना दुकानातील कर्माचरी यांनी दरोडेखोरांना विरोध करताच चौघांपैकी एकाने गोळीबार केला. तर एकाने दोघांवर चाकूने हल्ला करून मोटरसायकलवरून पळ काढला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याला दोन गोळ्या लागल्याने कर्मचारी जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार भरबाजारत सुरू असताना घाबरून एक ही जण दरोडेखोराना रोखण्यासाठी पुढे आले नाही.

या दरोड्याची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी पळून गेलेल्या दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली आहे. या घटनेत दुकानातील २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटून पळ काढण्यात आला आहे. बोईसर, मीरारोड पाठोपाठ अंबरनाथ येथे ज्वेलर्स दुकानावर पडलेला दरोड्याचा घटनेमुळे ज्वेलर्स मालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, सहाजण ताब्यात


First Published on: January 10, 2021 8:02 PM
Exit mobile version