Viral Photo : इंटरनेटचा स्पीड चांगला येतो म्हणून थेट छतावर गेला आणि…

Viral Photo : इंटरनेटचा स्पीड चांगला येतो म्हणून थेट छतावर गेला आणि…

Viral Photo : इंटरनेटचा स्पीड चांगला येतो म्हणून थेट छतावर गेला आणि...

सध्याच्या युगात इंटरनेटचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे सरकारने देखील डिजीटल इंडियामार्फत अनेक महत्त्वाच्या गोष्टी इंटरनेटद्वारे सोप्या करण्याची सुरुवात केली आहे. मग, कॉलेजचा प्रवेश फॉर्म असो, एखाद्या योजनेचे फॉर्म असो किंवा बँकेची काही कामे असोत. सध्या घरबसल्या तुम्ही सहज ही कामे करु शकता. पण, यावेळी समस्या येते ती इंटरनेटच्या स्पीडची. कारण भारतात इंटरनेटचा स्पीड हा नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो.

अशी लढवली शक्कल

ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो. सर्वच ठिकाणी इंटरनेटची फार समस्या उद्भवते. मात्र, वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील येवला गावात इंटरनेटचा स्पीड नसल्याने एका शेतकऱ्यांनी भारी शक्कल लढवली आहे. इंटरनेटचा स्पीड चांगला येतो म्हणून शेतकरी थेट घराच्या छतावर जाऊन बसला आहे.

वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील येवता गावात CSC केंद्रात काम करणाऱ्या गजानन देशमुख यांनी एक शक्कल लढवली आहे. शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे अर्ज भरताना इंटरनेटचा स्पीडचा त्रास होत होता. यासाठी देशमुख यांनी घराच्या छतावर स्पीड चांगला येतो, म्हणून थेट छतावर खुर्ची आणि लॅपटॉप घेऊन बसले. देशमुख यांना शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा अर्ज भरायचा होता. त्यामुळे त्यांनी ही शक्कल लढवली. देशमुख यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. All India Radio News Pune च्या फेसबुक अकाऊंटवरही हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.


हेही वाचा – Sushant Sucide Case : केंद्राच्या नियमावलीनुसारच पोलीस अधीक्षकाला केले क्वारंटाईन; BMC चे स्पष्टीकरण


First Published on: August 3, 2020 12:21 PM
Exit mobile version