घरदेश-विदेशSushant Sucide Case : केंद्राच्या नियमावलीनुसारच पोलीस अधीक्षकाला केले क्वारंटाईन; BMC चे...

Sushant Sucide Case : केंद्राच्या नियमावलीनुसारच पोलीस अधीक्षकाला केले क्वारंटाईन; BMC चे स्पष्टीकरण

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबईत आलेले बिहार राज्यातील पाटणाचे पोलीस अधीक्षक बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेकडून क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारून त्यांना गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या अधीकारी कक्ष येथे क्वॉरंटाईन केले आहे. यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने या घटनेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांनी फक्त केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन केले आहे. पोलीस अधीक्षकाला सात दिवस मुंबईत राहायचे आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन केले आहे.

- Advertisement -

यावर आमच्याकडून तपास रोखण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली असल्याचा आरोप बिहार पोलिसांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी बिहार येथून या प्रकरणात तपासासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना क्वॉरंटाईन का करण्यात आले नाही. आयपीएस अधिकारी आणि पाटणाचे पोलीस अधीक्षक बिनय तिवारी यांनाच का क्वारंटाईनचा शिक्का मारला, असाही बिहार पोलिसांकडून आरोप होत आहे.

यासंबंधी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘आज (२ ऑगस्ट) आयपीएस बिनय तिवारी सरकारी ड्यूटीसाठी पाटणाहून मुंबईत दाखल झाले. पण रविवारी रात्री ११ वाजता मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने क्वॉरंटाईन केले. विनंती करूनही त्यांना आयपीएस मेसमधील निवासस्थान उपलब्ध करून दिले नाही. ते गोरेगावमधील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते.’

- Advertisement -

बिहार पोलीस काल, रविवारी दुपारी मुंबईत दाखल झालेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक (शहर) बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वॉरन्टाईन केले. गोरेगाव येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये असलेल्या गेस्टरुममध्ये त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या हातावर स्टॅम्प मारून त्यांना या बाबतच्या सूचना दिल्या. बिनय कुमार यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वॉरन्टाईनमध्ये राहावे लागणार आहे.

हेही वाचा –

चीनशी ४ हजार कोटी राखींच्या व्यापाराचे ‘बंध’ भारतीयांनी तोडले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -