KCR meets Uddhav thacekeray : सुडाच्या राजकारणावर अखेर मुख्यमंत्र्यांनी सोडले मौन, म्हणाले…

KCR meets Uddhav thacekeray : सुडाच्या राजकारणावर अखेर मुख्यमंत्र्यांनी सोडले मौन, म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याविरोधातील भाजपने उठवलेली राळ, शिवसेना नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय यंत्रणांचा ससेमिरा तसेच विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना केले जाणारे टार्गेट यानिमित्ताने शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळतो आहे. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुडाच्या राजकारणामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यांचा पिच्छा या यंत्रणांनी पुरवला आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या सूडाच्या राजकारणावर मौन सोडले आहे. (Uddhav thaceray slams bjp over misusing ED, CBI central agencies for revenge politics after KCR meet )

देशातील वातावरण दिवसागणिक गढूळ असल्याचे सांगत तपास यंत्रणांच्या कारवाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असणाऱ्या कारवाईवर टीका केली. देशात एक सूडाचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर सुरू असल्याचेही ते म्हणाले. सूडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्व कधीच नव्हते अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. राष्ट्रीय पातळीवर आघाडी निर्माण करण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि माझ्यातील भेट आहे. राष्ट्रीय पातळीवर आघाडी निर्माण करण्याच्या विचाराला आकार उकाराला अवधी लागेल. पण ही प्रयत्नांची सुरूवात आहे. मेहनत करावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ?

आजच्या भेटीतून आम्ही लपवण्यासाठी काहीही ठेवलेले नाही. आमची भेट ही देशात काही वातावरण दिवसागणिक गढूळ होते आहे त्यानिमित्ताने होती. एक सुडाचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर सुरू असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आमच हिंदुत्व बदला घेणार नाही. देशाला शेवटी भविष्य काय ? तसेच देशाच काय होईल ? हा विचार करायला पाहिजे होता, ती सुरूवात आम्ही करतो आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. अशावेळी राज्या राज्यात चांगल वातावरण रहायला हव अशा एक नव्या विचारांची सुरूवात आम्ही करत आहोत. राष्ट्रीय पातळीवर आघाडी निर्माण करण्याच्या विचाराला आकार उकाराला अवधी लागेल. पण ही प्रयत्नांची सुरूवात आहे. मेहनत करावी लागणार आहे. फक्त मूलभूत प्रश्नांना हात न लागता आरोप करायचे हा कारभार मोडायला हवा असेही ते म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी समविचार पक्षांची ताकद निर्माण करणे या अनुषंगानेच ही भेट घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच के चंद्रशेखर राव यांना फोन करून भेटीचे निमंत्रण दिले होते. आज दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली.


KCR Uddhav thackeray Meet : महाराष्ट्रातून निघणारा मोर्चा यशस्वी होतो, समविचारी पक्षांसोबत लवकरच रणनिती आखणार – के चंद्रशेखर राव

First Published on: February 20, 2022 5:15 PM
Exit mobile version