मुंबईकर खेळाडूंचे विक्रम मुंबईकरांकडूनच मोडले जावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास

मुंबईकर खेळाडूंचे विक्रम मुंबईकरांकडूनच मोडले जावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास

मुंबईकर खेळाडूंचे विक्रम मुंबईकरांकडूनच मोडले जावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास

भारतीय संघासाठी मुंबईकर खेळाडूंनी केलेले विक्रम हे मुंबईकरांकडूनच मोडले जावेत यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातील राज्य सरकारचा भार उचलण्यासाठी सरकार मागे हटणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर यांनी पदार्पण केलेल्या दिवसाला शुक्रवारी ५० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांना सुनील गावस्कर आदरातिथ्य कक्ष बहाल केला. त्याचप्रमाणे क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेल्या नॉर्थ स्टॅण्डला माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात आले. यंदाचे वर्ष भारताचे माजी कसोटी वीर माधव मंत्री यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आयसीसीचे माजी अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार भारताचे माजी कसोटी वीर गुंडप्पा विश्वनाथ भारताचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर, असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.

गोल्डन मोमेंटस या नावाने करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांनी आपल्या कारकिर्दीतील सोनेरी क्षणांना उजाळा दिला. क्रिकेट स्टेडियममध्ये व्हीआयपी स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट बघण्यापेक्षा स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट बघणार्‍यांना ते अधिक कळते, असे सांगत शरद पवार यांनी अप्रतिम कोपरखळी मारली. त्याचा सामना करताना उद्धव ठाकरे यांनी याच व्हीआयपी स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट पाहिल्यामुळे आपण स्विंग आणि स्पिन उत्तम करतो, असे सांगत त्याला प्रत्युत्तर दिले. या कार्यक्रमात गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांची आपल्या आठवणींना उजाळा देणारी आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची वाटचाल कशी देदीप्यमान मार्गाने सुरू आहे हे दाखवणारी मान्यवरांची भाषणे झाली.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमधील आदरातिथ्य कक्षाला भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचे तर नॉर्थ स्टॅण्डला दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा : वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना २ वर्षांची संधी द्या, खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र


 

First Published on: October 29, 2021 9:49 PM
Exit mobile version