कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये पडला फुलांचा खच

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये पडला फुलांचा खच

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये पडला फुलांचा खच

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फूल शेतीला जबर फटका बसला आहे. पावसामुळे ओली झालेली फुलं बाजारात येईपर्यंत खराब होत आहेत. ऐन दिवाळीत फुलांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ही फुले फेकून द्यावी लागली आहेत. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत रस्त्यावर अक्षरश: फुलांचा खच पडला आहे. त्यामुळे आमच्या मुलांनी दिवाळी कशी साजरी करायची? असा उदिग्न सवाल शेतकरी करीत आहेत. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी फुलं रस्त्यावर फेकली

नाशिकहून कल्याणच्या बाजारात फुले विक्रीस येतात. पावसामुळे फुले बाजारात येईपर्यंत खराब होत आहेत. सध्या फुलांना पाच रुपये किलोच्या वर दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ही फुलं नाशिकहून कल्याणला आणण्यासाठीच एका किलोमागे ७ रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला दोन तीन रुपयेही मिळणार नसतील, तर आमच्या मुलांची दिवाळी कशी साजरी होणार? असा उद्विग्न सवाल योगेश शिंदे या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. फुलांना भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली फुलं रस्त्यावर टाकून देत परतीची वाट धरली आहे. तर अनेक शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दरानं फुलांची विक्री करताना दिसत आहेत. मात्र या सगळ्यातही अनेक जण ही फेकून दिलेली फुलंही जमा करून विकण्यासाठी नेताना पाहायला मिळत आहेत. सरकारने आम्हाला अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

First Published on: October 26, 2019 9:10 PM
Exit mobile version