दीड कोटींचे मांडूळ सर्प मनोरमधून ताब्यात

दीड कोटींचे मांडूळ सर्प मनोरमधून ताब्यात

मांडूळ साप

काळ्या जादुसाठी वापरले जाणारे मांडुळ जातीचे दोन सर्प मनोरमधून हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत दीड कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.मांडुळ जातीचे दोन सर्प मनोर-पालघर येथे विक्री करण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून पोचाडे येथील एका वाडीत छापा मारला.

त्यावेळी सुनील धानावा आणि पवन भोया यांच्याकडे कापडी पिशवीत एक 53 इंच लांबीचा आणि 4 किलो वजनाचा आणि दुसरा 41 इंच लांबीचा आणि एक किलो वजनाचा असे दोन मांडुळ सर्प सापडले.

या दोन्ही सर्पांची किंमत दिड कोटी रुपये असून ते विक्रीसाठी आणले होते. या सर्पांचा औषधी पदार्थ बनवण्यासाठी आणि अंधश्रद्धेतून काळ्या जादुसाठी वापर करण्यात येत असल्याची कबुली या दोघांनी दिली.

First Published on: April 4, 2019 6:20 AM
Exit mobile version