पाच हजारासाठी भाजीविक्रेत्याची तारेने गळा कापून हत्या!

पाच हजारासाठी भाजीविक्रेत्याची तारेने गळा कापून हत्या!

पाच हजारासाठी भाजीविक्रेत्याची तारेने गळा कापून हत्या!

उसने घेतलेले पाच हजार रुपये परत केले नाही या कारणावरून ७० वर्षीय भाजीविक्रेत्याची तारेने गळा कापून हत्या केली. ही खळबळजनक घटना उल्हासनगर येथे घडली आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय युवकाला गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

७० वय वर्ष असणाऱ्या शेजुमला केरूमल रामनानी असे हत्या कऱण्यात आलेल्या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. उल्हासनगर येथील वासारगाव शिवार येथे राहणारे शेजुमल यांचा १९ जून रोजी जवळच असणाऱ्या निर्जन स्थळी मृतदेह सापडला होता. शेजुमल यांची तारेने गळा कापून हत्या कऱण्यात आली होती. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरु केला. या हत्येचा संलग्न तपास गुन्हे शाखा घटक ४ चे पोलीस पथक करीत होते, पोलिसांनी घटनास्थळापासून काही अतंरावर असलेले सीसीटीव्ही तपासले असता शेजुमल एका व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून जात असताना सिसिटोव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

गुन्हे शाखा घटक ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने संशयित म्हणून त्याच परिसरात राहणार विठ्ठल गणेश दुधेशीया (३२) याला ताब्यात घेतले. आणि त्याची कसून चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. लॉकडाऊन पूर्वी शेजुमल रामनानी याने विठ्ठल दुधेशिया यांच्याकडून ५ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र लॉकडाऊनमुळे शेजुमल हा पैसे परत करू शकत नसल्यामुळे विठ्ठलने त्याला आणखी पैसे देण्याचे अमिश दाखवले, आणि १९ जून रात्री शेजुमलला दुचाकीवर बसवून वासरगाव जवळील एका निर्जनस्थळी घेऊन आला. तेथे पडलेल्या तारेने शेजुमलचा गळा आवळला, तारेमुळे शेजुमल याचा गळा कापला गेल्याने शेजुमलचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती कबुली अटक कऱण्यात आलेल्या विठ्ठल दुधेशीया याने पोलिसांना दिली. या हत्येप्रकरणी विठ्ठल दुधेशिया याला अटक कऱण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.


Corona: मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी चाळीशी पार!
First Published on: June 25, 2020 8:33 PM
Exit mobile version