तावडेंनी आधी पंतप्रधानांच्या दौऱ्यातील खर्चाचा तपशील द्यावा – मनसे

तावडेंनी आधी पंतप्रधानांच्या दौऱ्यातील खर्चाचा तपशील द्यावा – मनसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे विरूद्ध विनोद तावडे अशी शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. सातत्याने तावडेंकडून राज ठाकरे यांच्या टीका करणारे वक्तव्य समोर येत असतानाच मनसेदेखील त्यांना तोडीसतोड उत्तर देत आहे. आताही असे काही वक्तव्याला प्रतिउत्तर मनसेने दिले आहे. राज ठाकरे यांच्या सभा कुणासाठी आणि खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे करणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा तपशील जनतेला आधी द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.

काय म्हणाले किल्लेदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लोकसभा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल त्रिपुरा, मणिपूर अशा विविध राज्यांचा दौरा केला होता याचे स्पष्टीकरण देवू शकाल का? राज साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या सभांचा धसका भाजपा नेत्यांनी घेतला असून त्यांच्या भाषणाचा प्रभावाने भाजपच्या मतांवर परिणाम होईल. या भीतीपोटी बिथरलेल्या तावडे यांनी तथ्य नसतानाही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. याचा त्यांना काडीमात्र फायदा होणार नाही. आतातापर्यंत झालेल्या राज साहेबांच्या सभेमध्ये त्यांनी कोणत्याही पक्षाचे चिन्ह, झेंडे न लावता अमुक उमेदवाराला मत द्या, असे भाषण दिले नाही. गेल्या ५ वर्षाच्या काळातील भाजपचे धोरणे आणि फसवेगिरी यांना बळी पडू नये हेच आव्हान त्यांनी जागरूक नागरिकांना केले. राजसाहेब कोणत्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. पंतप्रधानाबद्दल जाहीर सभा घेवून मत मांडण्याचा अधिकार त्यांना नाही का, असे असताना देखील विकासात्मक मुद्द्यांवर भाष्य करायचे टाळून राज ठाकरे यांच्या सभेच्या खर्चाचा बोलबाला करणे हा राज साहेबांबद्दल असलेला दराराच म्हणावा लागेल.

First Published on: April 15, 2019 4:14 PM
Exit mobile version