Video: भांडूप कॉम्प्लेक्समध्ये पाईपलाईन फुटली, घाटकोपरमध्ये आज पाणी नाही!

Video: भांडूप कॉम्प्लेक्समध्ये पाईपलाईन फुटली, घाटकोपरमध्ये आज पाणी नाही!

घाटकोपर विभागाला भांडुप काम्प्लेक्समधल्या ७२ इंचाच्या जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. पण सोमवारी अचानक ही जलवाहिनी फुटली आणि या वाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू झाली. या गळतीच्या प्रचंड वेगामुळे पहिल्या तासाभरातच हजारो लीटर पाणी वाहून गेलं. त्यामुळे घाटकोपर विभागात मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येण्याची देखील शक्यता आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध असलेलं पाणी जपून वापरावं असं आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, सोमवारी मरोळ मरोशी येथेही मोठी पाईपलाईन फुटली होती. त्यामुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी विलेपार्ले येथे मंगळवारी सकाळी पाणी पुरवठा झालेला नाही. तर विलेपार्लेच्या पश्चिम भागातील काही ठिकाणी पाणी पुरवठा झाला नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, फुटलेली जलवाहिनी लवकरात लवकर दुरूस्त करून पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न मुंबई महानगर पालिकेच्या जलविभागाचे कर्मचारी करत असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

वेरावली जलाशय समूहाला पाणीपुरवठा करणारी भांडुप – मरोशी मुख्य जलवाहिनी ही पवई येथे गळतीग्रस्त झाली आहे. सदर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने तात्काळ हाती घेतले असून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत आज अंधेरी पूर्व आणि पार्ले पूर्व येथे पाणीपुरवठा होणार नाही.          – अभिजित सामंत, नगरसेवक, के पूर्व विभाग

First Published on: November 19, 2019 8:47 AM
Exit mobile version