पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माहिम – माटुंगा दरम्यान रुळाला तडे

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माहिम – माटुंगा दरम्यान रुळाला तडे

Railway

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. माहिम – माटुंगा स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अंधेरीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे. तर चर्चगेटकडे येणारी वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून सध्या याठिकाणी रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.

शुक्रवारी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. कुर्ला – सायन स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला होता. मात्र, आज पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.

First Published on: January 18, 2020 8:47 AM
Exit mobile version