ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते दहिसर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांना मनस्थाप सहन करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वेच्या दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तेव्हापासून कोणतीही लोकल जलद मार्गावरुन चर्चगेटच्या दिशेनं सोडण्यात आलेली नाही.

रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. काही वेळातच लोकल सेवा सुरळीत होईल अशी माहिती, पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान, याचाच परिणाम स्लो मार्गावरील वाहतूकीवर झाल्याचंही दिसून येत आहे. जलद मार्गावरील काही गाड्या स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

दहिसर ते बोरिवली दरम्यान, प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे. त्यासोबतच विरार, वसई, नालासोपारा या स्थानकांतही प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अद्याप लोकल सेवा पूर्ववत झालेली नाही. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

मुंबईतील स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवरील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. ९ मे २०२२ ते २३ मे २०२२ पर्यंत १५ दिवसांसाठी ही वाढ निश्चित करण्यात आली आहे.

अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी ९ मे पासून २३ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढवल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. त्यानुसार सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट आता १० रुपयांऐवजी ५० रुपयांना मिळणार आहे.


हेही वाचा – Platform Ticket : मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ; उद्यापासून नवीन दर लागू होणार

First Published on: May 9, 2022 7:36 AM
Exit mobile version