CoronaVirus Effect: पश्चिम रेल्वेचे ४२७ कोटींचे नुकसान!

CoronaVirus Effect: पश्चिम रेल्वेचे ४२७ कोटींचे नुकसान!

पश्चिम रेल्वे

कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे रेल्वे सेवा बंद आहे. परिणामी पश्चिम रेल्वेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. १ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत सुमारे ४२७ कोटीचे नुकसान पश्चिम रेल्वेला सोसावे लागले आहे. तसेच येणाऱ्या काळात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे.

कोरोनाचा विषाणूच्या साथीच्या आजारामुळे भारतीय रेल्वेने १४ एप्रिल २०२० पर्यंत देशभरातील प्रवासी रेल्वे सेवांचे कामकाज स्थगित केले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना विषाणूवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी मंगळवारी, सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ दिवस म्हणजे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला असल्याच घोषित केले आहे. परिणामी तत्काळ रेल्वे मंत्रालयाने देशातील प्रीमियम गाड्या, मेल/एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी लोकल, बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वेच्या तिजोरीवर फटका बसला आहे. १ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत सुमारे ४२७ कोटीचे नुकसान पश्चिम रेल्वेला सोसावे लागले आहे.

७५० कोटी पेक्षा जास्त होणार नुकसान 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १ मार्च ते ३१ मार्च पर्यंत २०७ कोटी ११ लाखांचा फटका बसला आहे. तर १ ते १५ एप्रिल या कालावधीत २२० कोटी ८० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवासह लांबपल्याचा गाड्या बंद असल्याने एकूण ४२७ कोटी ९१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहेत. आतापर्यंत पश्चिम रेल्वेचे हे सर्वाधिक नुकसान आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ३ मेपर्यंत लोकल आणि रेल्वे सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे तब्बल पश्चिम रेल्वेच्या ७५० कोटी पेक्षा जास्त नुकसान होणार आहे.


हेही वाचा – CoronaVirus: हिवाळ्यात पुन्हा कोरोना व्हायरसचं संकट येणार!


 

First Published on: April 16, 2020 8:18 PM
Exit mobile version