व्हॉट्सअॅपवरुन ड्रग्जची तस्करी

व्हॉट्सअॅपवरुन ड्रग्जची तस्करी

नशेच्या औषधाची विक्री

सोशल मीडियाच्या वाढत्यावापरा बरोबरच त्याचा गैरवापर देखील तितकाच केला जात आहे. वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे भारतात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्ट्राग्राम यावर दररोज लाखोच्या घरात युजर्स जोडले जात आहेत. मात्र याचा दुरुपयोग ही तितकाच होत असल्याचे दिसून येत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नदीम रफिक मन्सुरी ऊर्फ गुड्डी याला माहिमच्या कापड बाजार परिसरातून मनाली क्रिम या महागड्या चरस साठ्यासह अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने रंगेहाथ पकडले आहे.

व्हॉट्सअॅपवरुन अशी करायचे तस्करी

नदीम रफिक मन्सुरी ऊर्फ गुड्डी या आरोपीने सांगितल्याप्रमाणे सध्या बॉलिवूड आणि इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची खरेदी करतात. मात्र ही बाब कोणालाही कळू नये याकरता ते व्हॉट्सअॅपच्या माध्यमाचा वापर करतात. गुड्डू आणि त्याचे सहकारी हायप्रोफाईल नशेबाजांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अंमली पदार्थ पुरवत त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवरुन संपर्क साधत होते. गुड्डू आणि त्याच्या सहकाऱ्याकडे कोणता चरस किती प्रमाणात उपलब्ध आहे. त्याची किंमत किती याची सर्व माहिती व्हॉट्सअॅपवद्वारे नशेबाजांना सागंतात. त्यानंतर त्यांचा सौदा ठरल्यानंतर डिलेव्हरी देण्यासाठी कुठे आणि कधी येणार? कोण द्यायला येणार याची इंत्थभूत माहिती हे तस्कर व्हॉट्सअॅपवर मेसेज अथवा रेकोर्डिंग करुन पाठवायचे.

तस्करी करणाऱ्यांची चतुराई

आपण ज्या ड्रग्जची डीलिंग करत आहे. ते कोणालाही कळू नये याकरकता ड्रग्ज तस्करी व्हॉट्सअॅपचा आधार घेत होते. व्हॉट्सअॅप वरुन आपण तस्करी करत आहोत हे देखील पोलिसांना देखील कळू नये याकरता ते व्हॉट्सअॅपचा वापर करत होते. त्यातील बराच जणांना लिहिता येत नसल्याने ते मेसेज रेकोर्डिंग करुन खरेदी विक्री करायचे.


संबंधित बातम्या

वाचा – ५ कोटी फेसबुक युजर्सची खाती हॅक

वाचा – ‘या’ कारणावरुन फेसबुक बनला चिंतेचा विषय


First Published on: October 24, 2018 11:05 AM
Exit mobile version