नवी मुंबईत १० अनधिकृत शाळा

नवी मुंबईत १० अनधिकृत शाळा

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० प्राथमिक शाळा शासनाची, नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम २००९ मधील कलम-१८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही.

तरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत.
ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

अनधिकृत शाळांमध्ये अल मोमिना स्कुल, सेक्टर-८ बी, आर्टिस्ट व्हिलेज, सी.बी.डी. बेलापूर, इकरा इंटरनॅशनल स्कुल, सेक्टर-२७ , नेरुळ , द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल , सीवुड, सेक्टर-४० , नेरूळ., नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कुल, तुर्भेस्टोअर्स, रोज बड्स स्कुल, तुर्भेस्टोअर्स, नवी मुंबई., सरस्वती विद्यानिकेतन स्कुल, सेक्टर-५ , घणसोली, अचिएवर्स वर्ल्ड प्रायमरी स्कुल, सेक्टर-१ , घणसोली, इम्पाईसीस इंग्रजी स्कुल, सेक्टर-२ , घणसोली, ब्लोसोम स्कुल, घणसोली गांव, नवी मुंबई, इलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकर नगर, रबाले या शाळांचा समावेश आहे.

First Published on: March 11, 2021 9:25 PM
Exit mobile version