मालमत्ताकरात ४० ते ५० टक्के सूट; महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या सूचना

मालमत्ताकरात ४० ते ५० टक्के सूट; महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या सूचना

पनवेल महापालिकेत विकासकामे करण्यासाठी आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेला कर लावणे आवश्यक आहे. पण तो कर नागरिकांवर अन्यायकारक नसावा. वार्षिक भाडे मूल्य ५० टक्के कमी करून आणि इमारतींना घसारा लावून कर आकारावा. सिडको वसाहतीतील नागरिकांनी सिडकोला दिलेला सर्व्हिस टॅक्स कमी करून द्यावा, असे मंगळवारच्या विशेष महासभेत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी प्रशासनाला सांगितल्याने पनवेलकरांना मालमत्ताकरात ४० ते ५० टक्के सूट मिळणार आहे. पनवेल महापालिकेची स्थापना १ ओक्टोंबर २०१६ रोजी झाली. त्यामध्ये पूर्वाश्रमीचे नगरपरिषदेचे क्षेत्र तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या २३ ग्रामपंचायती (२९ महसुली गावे) व सिडको अंतर्गत क्षेत्राचा समावेश करण्यात आला. नव्याने समाविष्ट क्षेत्रातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये नव्याने अंदाजे २ लाख ४६ हजार १८५ इतक्या मालमत्ता आढळून आल्या आहेत. तसेच पूर्वाश्रमीच्या नगरपरिषद हद्दीतील ४३ हजार ९१९ व पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील ३० हजार ३१९ अशा एकूण ३ लाख २० हजार ८२३ मालमत्ताना कर आकारणी करण्यात येणार आहे.

महापालिकेने ३१ मार्च २०१७ च्या सर्वसाधारण सभेतील प्रशासकीय ठराव क्रमांक १ अन्वये वार्षिक भाडे मूल्य दर निश्चित करण्यात आले. सादर वाजवी वार्षिक भाडे मूल्य दर कमाल रुपये ६२४ व किमान रुपये ३४३ प्रती चौ. मीटर प्रतीवर्षी निश्चित करण्यात आले. त्यानुसार काही मालमत्तांची कर आकारणी करण्यात आली. त्यानंतर १७ डिसेंबर २०१९ च्या सर्व साधारण सभेतील ठराव क्रमांक ११८ पनवेल महापालिका हद्दीतील मालमत्ताना कर आकारणी, तसेच करांचे दर निश्चित करणे करता मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील महानगरपालिकांच्या कर दराचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ३ जून २०१९ रोजी समिती नेमण्यात आली. या समितीने महानगर पालिका क्षेत्राचे ८ विभाग (नोड) व ४ उपविभाग (झोन) मध्ये विभागणी करून वार्षिक भाडे मूल्य निश्चित केले. जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्ताना विशेष नोटीसा देऊन २१ दिवसात हरकती मागवण्यात होत्या.

पनवेल महापालिकेला ५ वर्ष पूर्ण झाल्यावर शासनाचे सहाय्यक अनुदान बंद होणार आहे महापालिकेच्या ११०. ६ चौ. किमी. क्षेत्रफळामध्ये नव्याने समाविष्ट झालेला अविकसित ग्रामीण भाग, महापालिकेची अद्याची आर्थिक स्थिती आकृतीबंध मंजूर झाल्याने वेतनापोटी होणारा आस्थापना खर्च व शहर विकासासाठी आवश्यक असणारा विकास निधी मालमत्ता कारातून भागवण्यात येण्यासाठी मालमत्ताकर हे महापालिकेचे एक मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत असल्याने याविषयावर चर्चा करण्यासाठी पनवेल महापालिकेची सोमवारी स्थगित झालेली विशेष सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. यावेळी सभागृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उप महापौर जगदीश गायकवाड, उपायुक्त संजय शिंदे आणि नगर सचिव उपस्थित होते. तर सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिति सभापती संतोष शेट्टी आणि प्रभाग समिति सभापतीही ऑनलाइन हजर होते.

हेही वाचा –

Coronavirus: काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह

First Published on: April 9, 2021 5:04 PM
Exit mobile version