जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

अलिबाग: नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ’योजना सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या १४ तालुक्यांमध्ये येत्या सोमवारी, महाराष्ट्र दिनापासून दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्यात सुरु होणार्‍या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’त देण्यात येणार्‍या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोग शाळा तपासणी, टेलीकन्सलटेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील दवाखान्यांचे ठिकाण
* सावित्री पर्ल्स बिल्डिंग, ब्राम्हण अली अलिबाग.
* दहिवली, नगरपरिषद कर्जत.
* भानवाज बालवाडी, खोपोली,
* जुनी भाजी मंडई, चवदार तळ्याजवळ, महाड.
* जुने माणगाव, नगरपंचायत माणगाव.
* साबर बौद्धवाडी जवळ, बस स्टैंड, नगरपंचायत म्हसळा.
* दुकान नं. २७, मुरुड, नगर परिषद मुरुड.
* खारघर सेक्टर १२, पनवेल महानगरपालिका.
* म्हाडा कॉलनी, नगर परिषद पेण.
* स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह नगरपंचायत पोलादपूर.
* अष्टमी, रोहा नगर परिषद रोहा.
* जीवना कोळीवाडा, नगर परिषद श्रीवर्धन.
* तळा मंदाड रोड, रोड बिल्डिंग, एटी पोस्ट, तळा.
* कोटनाका, नगर परिषद उरण.

First Published on: April 28, 2023 9:52 PM
Exit mobile version