अखेर आदिवासी वाड्यांमध्ये वैद्यकीय सुविधा

अखेर आदिवासी वाड्यांमध्ये वैद्यकीय सुविधा

जागतिक महिला दिनानिमीत्त आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या प्रयत्नाने महापालिके मार्फत आदीवासी वाडीमध्ये ‘मोबाईल मेडिकल युनिट सेवा’ सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याहस्ते आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी शुभारंभ झाला. तसेच या वेळी आदीवासी वाडीतील महिलांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

पनवेल महापलिका हद्दीतील फणसवाडी आणि चाफेवाडी या आदीवाड्यांमध्ये महापलिकेमार्फत ‘मोबाईल मेडीकल युनिट सेवा’ सुरु करण्यात आली आहे. ही सेवा नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहकडे पाठपुरावा करुन तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे.
गेल्या वीस वर्षांपासून सिडको आणि ग्रापंमपंचायतीच्या माध्यमातून अश्या प्रकारची कोणतीही सेवा या आदीवासीवासी वाड्यांमध्ये देण्यात आली नसून, हर्षधा उपाध्याय यांनी ही वैदयकीय सेवा महापालिकेमार्फत सुरु केली आहे.

‘मोबाईल मेडिकल युनिट सेवेच्या शुभारंभा वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, नगरसेवक शत्रृघ्न काकडे, नगरसेविका हर्षधा उपाध्याय, भाजपनेते वासुदेव पाटील, अमर उपाध्याय, मोना आडवाणी, गीता चौधरी, शामलाल सुरेश, मुधीमीता जीना, शोभा मिश्रा, बीना गोगरी, किरण रावडे, अजय जाधव, सचिन गणबाज, सुरेश पारधे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच या वेळी भारतीय जनता पार्टी आणि नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या वतीने आदिवासी वाड्यांमधील महिलांना अन्नधान्याचे वााटप करण्यात आले.

First Published on: March 11, 2021 9:31 PM
Exit mobile version