१४ तालुक्यांमध्ये ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु

१४ तालुक्यांमध्ये ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु

अलिबाग: शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यावे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
सत्यजित बडे, अलिबाग नगरपरिषद मुख्यधिकारी अंगाई साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्यवर्धिनी सल्लागार डॉ. सागर काटे उपस्थित होते

विविध सेवा मिळणार
या दवाखान्यात बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोग शाळा तपासणी, टेलीकन्सलटेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहेत.

जनतेच्या सेवेसाठी आपला दवाखाना – मुख्याधिकारी भुसे
मुरुड:  आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना पुरेपूर आरोग्य सुविधा उपलब्ध होतील पुढील काळात जनतेच्या सेवेसाठी आपला दवाखाना सज्ज असेल, असे प्रतिपादन मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले.
नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना’ सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या १४ तालुक्यांमध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी दवाखाने सुरु करण्यात आले. या दवाखानाचे उद्घाटन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी भुसे यांनी फित कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी लहाने,आरोग्यवर्धिनी केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत डोंगरे, राजेंद्र चुनेकर, मनोज पुलेकर, नवापाडा कोळी समाज अध्यक्ष सवाई, गजानन तरे, गणेश शिंदे, प्राची कारभारी, मयूर पाटील, नंदकुमार घाडगे तसेच पदाधिकारी आणि स्थानिक नागरीक उपस्थित होते
मुख्याधिकारी -पंकज भुसे पुढे म्हणाले की
राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या कानाकोपर्‍यात आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना ही संकल्पना राबविली असून दवाखान्याचा शुभारंभ होत आहे. आरोग्य प्रशासनाने मोठ्या मेहनतीने शहरात दवाखाना उभा केला आहे. याचा पुरेपूर लाभ तालुक्यातील रुग्णांना होणार आहे.
– पंकज भुसे,
मुख्याधिकारी, मुरुड-जंजिरा नगरपरिषद

First Published on: May 1, 2023 9:33 PM
Exit mobile version