कामगारांकडून अर्थव्यवस्थेला बळ – विजय लोखंडे

कामगारांकडून अर्थव्यवस्थेला बळ – विजय लोखंडे

कामगार कल्याण मंडळ पनवेल व पनवेल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेट, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट ली. चे अध्यक्ष, विजय लोखंडे जी, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे अरविंद मोरे, बँकेचे पनवेल शाखेचे शाखा प्रबंधक, महेश कुऱ्हेकर, बँकेचे तळोजा शाखेचे शाखा प्रबंधक, प्रशांत वाघमारे, व्ही के श्रीवास्तव, विजयकुमार पाटील, उद्योजक हर्षल सूचक, सिद्धार्थ सूचक, गौरव जोशी, मॅनेजर डी.डी. सावंत, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शीतल महाले व कामगार कल्याण मंडळाचे केंद्र प्रमुख, प्रवीण सकट आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विजय लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यानंतर राष्ट्रगीत होऊन मान्यवरांची भाषणे झालीत. या प्रसंगी विजय लोखंडे म्हणाले की अर्थव्यवस्था हळू हळू पूर्व पदावर आणण्यासाठी देश प्रयत्न करीत असून त्यात पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट युनिटचे सर्व सभासद हातभार लावत असल्यामुळे ह्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

अर्थव्यवस्थेची घडी पूर्व पदावर आणण्यासाठी आपण सर्वानी प्रत्येकामध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याची गरज या प्रजासत्ताक दिना निमित्त आहे असे सांगून त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे अरविंद मोरे म्हणाले की, उद्योग आणि बँक हे दोघे राष्ट्रउभारणीसाठी प्रयत्न करीत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या अथक परिश्रमाने संविधान तयार करून आपणास दिल्यामुळे आपली जबादारी आणि कर्तव्य यांचे जाण ठेऊन आपण राष्ट्राप्रती देणे लागत असून राष्ट्रभावना जागविण्याचे मोलाचे कार्य व संविधानाचे पालन आपण केले पाहिजे.

बँक ऑफ महाराष्ट्राचे पनवेल शाखेचे शाखा प्रबंधक महेश कुऱ्हेकर म्हणाले की, आपले स्वास्थ व अर्थव्यवस्थेचे स्वास्थ चांगले ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. बँक ऑफ महाराष्ट्र विविध घटकांना कर्ज पुरवठा करीत असून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण आज प्रजासत्ताक दिनी संकल्प करूया की, आपण प्रत्येकाने देश प्रगतीसाठी हातभार लावूया. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, अतिथींचे स्वागत व आभार प्रदर्शन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलचे केंद्र प्रमुख प्रवीण सकट यांनी केले.

हेही वाचा – 

Mumbai Local: खुशखबर! १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल

First Published on: January 29, 2021 3:08 PM
Exit mobile version