घरठाणेसरकारी तिजोरीत 330 कोटी 28 लाख

सरकारी तिजोरीत 330 कोटी 28 लाख

Subscribe

ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे यश

ठाणे । बेकायदा दारू व्यवसाय रोखण्यासाठी त्यावर करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकले आहे. विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात चार कोटींचा अधिक महसूल मिळाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 330 कोटी 28 लाख रुपयांचा शासनाकडे जमा केले आहेत आहे. राज्य शासनाच्या प्रमुख आर्थिक स्रोता पैकी एक असणार्‍या राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. राज्य सरकारचा महसुल कसा वाढेल या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून, अतिशय कमी मनुष्यबळात विभागाचे प्रत्येक कार्यालयाने भरीव कामगिरी आहे. यामध्ये ठाणे विभागाने आर्थिक वर्षात सुमारे 330.30 कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.

गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) 326 कोटी रुपये जमा केले होते. या आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांचा महसूल अधिक जमा झाला आहे. दारूची दुकाने, बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून राज्यात येणार्‍या मद्यावरील शुल्क (आयात शुल्क), परवाना दुसर्‍या जागी स्थलांतर करणे (विशेष अधिकार शुल्क ) अशा विविध मार्गांनी विभागाकडे महसूल जमा होत असून, या वर्षात 33े कोटी 28 लाखांचा महसूल जमा झाला आहे. अवैध दारू विक्रीवर कारवाई करत असल्यामुळे छुप्या पद्धतीने दारू व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे सरळ मार्गी दारू विक्री करण्याचे प्रमाण वाढत आहे. या सर्वाचा फायदा विभागाला महसूल वाढीसाठी होताना दिसतो. मार्च महिन्यात विभागीय अधिकारी कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम केले होते. अणि याचा परिणाम गेल्या वर्षी पेक्षा यंदा करापोटी अधिक पैसे शासन तिजोरीत जमा झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -