महाराजांच्या घरावर दरोडा टाकणारे तीन दरोडेखोर गजाआड

महाराजांच्या घरावर दरोडा टाकणारे तीन दरोडेखोर गजाआड

तोतया पोलीस अधिकार्‍याच्या आवळल्या मुसक्या

नेवासा  तालुक्यातील चांदा येथे 29 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या दरोड्याच्या घटनेतील तिघा आरोपींना अटककरण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला यश आले. तिघेही आरोपी नेवासा तालुक्यातील आहेत. या सर्वांना काल नेवासा न्यायालय हजर केले असता 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री चांदा येथील आडभाई व गायकवाड वस्तीवर दरोडा पडला होता. सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता.पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. अशा प्रकारचे गुन्हे करणार्या व स्थानिक गुन्हे शाखेच्या अभिलेखावर असलेल्या सराईत गुन्हेगारांचे फोटो फिर्यादी व साक्षीदार यांना त्यांनी दाखविले.

त्यातील काही फोटो फिर्यादी व साक्षीदार यांनी ओळखल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे आदींनी आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन आरोपींचा शोध घेतला.या गुन्ह्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने डांगर उर्फ प्रवीण छगन भोसले रा.मुकिंदपुर, सुदाम उर्फ शिवदास सुमन भोसले रा. गेवराई ता. नेवासा व पंकेश उर्फ पंक्या जगताप भोसले रा. फत्तेपुर ता.नेवासा यांना अटक करण्यात आली.

First Published on: September 4, 2021 7:18 PM
Exit mobile version