वादळाने उडवले हॉटेलचे छत, एकाचा मृत्यू

वादळाने उडवले हॉटेलचे छत, एकाचा मृत्यू

मालेगाव-धुळे हायवेवरील चाळीसगाव फाट्यानजीक असलेल्या हॉटेल एकताचा स्लॅब कोसळून शनिवारी (दि.२९) एक व्यक्ती ठार झाला. दुपारच्या सुमारास जोरदार वादळामुळे हॉटेलचा काही भाग कोसळला. त्याखाली काही ग्राहक दबले गेल्याचे सांगण्यात आली. या घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. वादळामुळे कोसळलेल्या छताच्या मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने, मोठी प्राणहानी टळली.

First Published on: May 29, 2021 10:16 PM
Exit mobile version