पालघर जिल्ह्यामधील १६ शाळा शिक्षण विभागाकडून नापास

पालघर जिल्ह्यामधील १६ शाळा शिक्षण विभागाकडून नापास

पालघर : पालघर जिल्ह्यात अनधिकृत शाळांची संख्या मोठी असल्याने कारवाईची मागणी केली जात असताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शासनाची मान्यता नसताना सुरू असलेल्या 16 अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे.तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या आयुक्तांचा आदेश आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकार्‍यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.गुन्हे दाखल झालेल्या शाळांमध्ये पालघर तालुक्यातील 5 आणि वसई तालुक्यातील 11 शाळांचा समावेश आहे.संचालकांना शाळा बंद करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्यानंतरही शाळा अनधिकृतपणे सुरूच होत्या.आयुक्तांच्या आदेशाने गुरुवारी नऊ शाळांवर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांवर कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. पालकांनी त्यांच्या पाल्याना शाळेत प्रवेश घेताना शाळांच्या परवानगी बाबत माहिती घेऊन शासनाची मान्यता असलेल्या शाळेतच प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती पंकज कोरे यांनी केले आहे.

पालघर तालुका
सुमित्रा एज्युकेशन सोसायटी,डी.एस.मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बोईसर,लिटिल एंजल प्रायमरी स्कूल बोईसर,मातोश्री आशादेवी विद्या मंदिर- नगर शिगाव रोड, स्वामी विवेकानंद विद्यालय-सफाळे,ज्ञानोदय विद्यामंदिर- धोंदल पाडा केळवे रोड,या अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली.

वसई तालुका
स्वामी विवेकानंद, सेंट झेवियर अँड मेरी कॉन्व्हेंट स्कुल, कुमर मेरी पब्लिक स्कूल, शांतिनिकेतन विद्यालय, लॉर्ड्स इंग्लिश स्कूल, गॉड ब्लेस स्कूल, चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल, पोल स्टार इंग्लिश स्कूल, मोहम्मदी उर्दू प्रायमरी स्कूल, शारदा निकेतन आणि शारदा विद्या मंदिर या शाळांवर कारवाई करण्यात आली.

First Published on: April 28, 2023 10:11 PM
Exit mobile version