बोगस आरोग्य विमा मंजूर करणारे डॉक्टर, लॅबमालक गजाआड

बोगस आरोग्य विमा मंजूर करणारे डॉक्टर, लॅबमालक गजाआड

खोट्या आजाराचा बनाव रचून चक्क आरोग्य विमा मंजूर करणाऱ्या डॉक्टर आणि रक्तचाचणी प्रयोग शाळा चालकाला मिरा रोड पोलिसांनीअटक केली आहे. सतत बोगस विमा प्रस्ताव नाकारणाऱ्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करताना हे रॅकेटच पोलिसांच्या हाती लागले आहे. या रॅकेटमध्ये अनेक मोठी रुग्णालये, लॅब यांचाही सहभाग असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नेक्सेस हेल्थ केअर या विमा कंपनीत काम करणारे संजय कुमार रुग्णालयाकडूनआलेल्या रुग्णांची आरोग्य विम्याची तपासणी आणि चौकशी करूनत्याचा अहवाल नेक्सस हेल्थ केअर कंपनीला पाठवतात. ते कोणतेही बोगस आरोग्य विमा प्रस्ताव मंजूर करत नव्हते. त्यामुळे डॉ. रोहित मिश्रा, शावांश रक्ततपासणी प्रयोगशाळेचे चालक शिमांचल मिश्रा, एफ-९ हेल्थ केअरचे रक्ततपासणी प्रयोगशाळेचे चालक राजेश मिश्रा आणि त्यांचा साथीदार कृष्णा ऊर्फ भरत मिश्रा यांची अडचण होत होती.

त्यामुळे संतापलेल्या या चौकडीने संजय कुमार यांना १६ मार्च रोजी भाईंदर पूर्वेकडील आरबीके शाळेसमोर बोलावून घेतले होते. त्याठिकाणी त्यांनी संजय कुमार यांची समजूत घालून विम्याचे प्रस्ताव मान्य करण्यासंबंधी सांगितले. पण, संजय कुमार यांनी विम्याचे खोटे प्रस्ताव मान्य करणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यामुळे संतापलेल्या चौकडीने संजय कुमार यांना गाडीत घातले. त्यानंतर वाटते त्यांना बेदम मारहाण केली. संजय कुमार यांनी आपले वकील मित्र शंभू झा यांच्या मदतीने मीरा रोड पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल केली. त्यानंतर डॉ. रोहित मिश्रा, शिमांचल मिश्रा, कृष्णा ऊर्फ भरत मिश्रा यांना अटक केली. तर चौथा आरोपी राजेश मिश्रा फरार झाला आहे.

पोलीस चौकशीत विम्याचे खोटे प्रस्ताव ही चौकडी तयार करून विम्या कंपन्यांकडून पैसे लाटत असल्याचे उजेडात आले. रक्तचाचणी प्रयोगशाळेतून आजाराचे खोटे निदान करणारे रिपोर्ट तयार केले जातात. त्यानंतर डॉक्टरांकरवी आरोग्य विमा मंजूर करण्याची हमी देणे आणि रुग्णालय सुचवले जातात. नंतर टक्केवारीच्या हिशोबात एकूण बिलाच्या रकमेत २०० ते ३०० टक्के वाढ करून जादा रक्कम आरोग्य विमा कंपन्यांकडून लुटली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या रॅकेटमध्ये अनेक मोठी रुग्णालये, लॅब यांचाही सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

हेही वाचा –

एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

First Published on: March 23, 2022 8:27 PM
Exit mobile version