एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

यामुळे आधीच उन्हाच्या तीव्र झळा सहन करणारे नागरिक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने हैराण झाले.

Pimpri Chinchwad Massive power outage leaves 60,000 consumers without electricity in Akurdi and Bhosari
एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ; नेमक झालं काय?

राज्यभरात वीज बिल न भरल्याने विद्युत जोडणी तोडण्याचे सत्र सुरु आहे. मात्र पुण्यात एका मांजराने तब्बल हजारो ग्राहकांच्या घरातील विद्युत पुरवठा खंडीत केल्याची घटना घडली आहे. या मांजरामुळे 60 हजार ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ आली. पुण्याच्या भोसरी, आकुर्डीमधील अचानक बिघाड झाल्याने बत्ती गुल झाली होती. यामुळे महापारेषण कंपनीला 100 कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला.

महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 मेगावॅट क्षमतेच्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये बुधवारी सकाळपासून बिघाड झाला. यामुळे भोसरी आणि आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसह जवळपास 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अचानक बंद झाला. यामुळे ग्राहकांना पर्यायी विद्युत सुविधा उपलब्ध करू देणे देखील शक्य झाले नाही. पण हा सर्व प्रकार एका मांजरामुळे घडला आहे. एक मांजर विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आल्याने 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला.

यामुळे आधीच उन्हाच्या तीव्र झळा सहन करणारे नागरिक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने हैराण झाले. बाहेर उकडत्या उन्हामुळे लोकांना अंधारात बसावे लागेल. तर अनेकांनी महावितरण कंपनीच्या कारभारावर रोष व्यक्त केला. भोसरीमधील गवळी माथा या ठिकाणी महा महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रामध्ये 100 एमव्हीए क्षमतेचे दोन व 75 एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र यातील 00 एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण 26 वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो.

मात्र यातील 100 एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी 6 च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण 10 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा अचानक बंद झाला. याचा फटका जवळपास 60 हजार ग्राहकांना सहन करावा लागला.

कारण या ट्रान्सफॉर्मरद्वारे पुण्यातील भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर, नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांना वीजपुरवठा होतो. मात्र सद्यस्थितीत तो बंद आहे. या घटनेनंतर महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या मोबाईल नंबरवर मेसेजद्वारे माहिती देण्यात आली आहे.

सध्या महापारेषणकडून बिघाड झालेल्या 100 एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची तपासणी सुरु आहे. यादरम्यान हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहेय त्यामुळे महापारेषणच्या 220 केव्ही उपकेंद्रात सध्या सुरु असेलल्या एकमेव 75 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून त्यावरील 16 वीजवाहिन्यांसह सध्या बंद असलेल्या 10 वीजवाहिन्यांना देखील पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा द्यावा लागणार आहे. यामुळे आता भोसरी परिसरातील वीजपुरवठा अधिक बिघडण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान मोदी कधीही सुडाचे राजकारण करत नाहीत; केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया