भात पिकांवर अळींचा प्रादुर्भाव; उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता

भात पिकांवर अळींचा प्रादुर्भाव; उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता

सद्यस्थितीत वातावणात वारंवार होणारे बदल, निसर्गाचा अनियिमतपणा, पावसाने विश्रांती घेतलेल्या विश्रांतीने वातावरणात उष्णतेचे प्रमाण अधिक वाढल आहे. त्याचा परिणाम भातपिकांवर होत असून या कोंदट, उष्ण वातारवणामुळे आलेल्या टवदार भातपिकावर पाने गुडाळणारी अळी (बगळ्या रोगाचा) प्रादुर्भाव झाला आहे. अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांवर परिणाम होण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

विक्रमगड तालुक्यातील सारशी, आंबेघर, धरमपूर, केगवा, खडकी, सातखोर, व इतर गावात भात पिकांवर अळींचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ लागला असुन अधिक फैलाव होण्याआधीच प्रशासनाने योग्य खबरदारी घेणे जरुरीचे झाले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या नियमानुसार ३३ टक्के नुकसान झाले तरच नुकसान भरपाई मिळते. त्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या लोकांना त्याचा लाभ घेता आला नाही. कोरोनामुळे शेतकरी व हातावर पोट असणारे लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच पावसाने विश्रांती घेतल्याने भात पिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पुन्हा नव्याने पंचनामे करून त्यांना त्याचा लाभ दिल्यास नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळू शकतो. म्हणून तातडीने रोगग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव किरण गहला यांनी तहसिलदारांकडे केली आहे.

अनियमित पावसामुळे दरवर्षी नुकसान होत आहे. यंदा चांगले पिक हाती येत आहे असे दिसत असतांना रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने अशा दुहेही संकटात शेतकरी सापडल्याने मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यांत आली आहे. विक्रमगड तालुक्यात ९० टक्के शेतकरी असून पावसाळी शेतीवरच येथील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह चालतो. बहुतेक शेतकरी भातशेतीच्या उत्पादनावरच संसाराचा गाढा ओढतात. परंतु आता निसर्गाच्या लहरीपणाने भातपिकाला कीड व रोंगाने ग्रासले आहे. या कीड व रोगाने तालुक्यातील विविध भागातील भाताचें पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अल्पभुधारक शेतकर्‍यांच्या डोळयांत पाणी आले आहे. तालुक्यातील अनेकविध भागात या कीड व रोगामुळे भाताचे मोठया प्रमाणावर भातपिकाचे नुकसान होण्याचे मार्गावर असून पंचायत समिती व तालुका कृषी विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रोगप्रतिबंधनात्मक औषध फवारणी व औषध उपलब्ध करुन देऊन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – 

मंदिरांपेक्षा जास्त गर्दी दारू दुकानांमध्ये, मग मंदिरे का बंद – फडणवीसांचा राज्य

First Published on: August 17, 2021 8:41 PM
Exit mobile version