आधार अद्ययावत करण्यासाठी “कॅन्टरव्हॅन ” उपक्रमाचा शुभारंभ

आधार अद्ययावत करण्यासाठी “कॅन्टरव्हॅन ” उपक्रमाचा शुभारंभ

पालघर: आधार कार्डधारकांसाठी दस्तऐवज अद्ययावत करण्याच्या कॅन्टरव्हॅन ” मोहिमेला जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. या मोहिमेचा उद्देश आधारकार्ड दस्तऐवज अद्ययावत करण्यासाठी प्रचार करणे हा आहे. “”कॅन्टरव्हॅन मोहीम हा एक मोबाईल उपक्रम आहे जो जिल्ह्यातील दुर्गम भागात आणि गावांपर्यंत पोहचणार आणि नागरिकांना त्यांच्या दारात आधारकार्ड विषयी अत्यावश्यक सेवा पुरविल्या जाणार आहेत. कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी गोविंद बोडके म्हणाले, “आधार कार्ड हे एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे जे विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. आधार कार्डावरील माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. कॅन्टरव्हॅन मोहीम हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे जो नागरिकांना आधार केंद्रांवर न जाता त्यांची आधार कार्ड माहिती अपडेट करण्याची संधी देईल.

ही मोहीम पुढील 30 दिवस चालणार असून, नागरिकांना कॅन्टरव्हॅनद्वारे पुरविल्या जाणार्‍या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले. या मोहिमेमध्ये आधार नोंदणी करण्यासाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेल्या मोबाईल व्हॅनचा समावेश असेल, आधारकार्ड विषयी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिरेल. कँटरव्हॅन मोहीम हा आधार कार्डाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील हजारो नागरिकांना फायदा होईल आणि त्यांना त्यांची आधार कार्ड माहिती सोयीस्करपणे अपडेट करता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आधार,संजीव जाधवर,जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उर्जित बर्वे जिल्हा समन्वयक स्वप्नील चव्हाण तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

First Published on: April 17, 2023 10:13 PM
Exit mobile version