सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना पंचायत समितीकडून दिलासा

सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना पंचायत समितीकडून दिलासा

पालघर तालुक्यातील मनोर ग्रामपंचायत हद्दीतील ख्वाजानगर कडे जाणारा मुख्य रस्ता व गटार निधी अभावी ग्रामपंचायतीने न बनल्याने रहिवासी सांडपाण्यातून मार्ग काढत जावे लागत होते. शेवटी संतप्त ग्रामस्थ शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांच्याकडे गेले असता चव्हाण यांनी पंचायत समितीमध्ये पाठपुरावा करून उर्वरित रस्ता व गटार नविनिकरण मंजूर करून भुयारी गटार आणि रस्त्याचे काम त्वरित करून घेतले. दोन वर्षांपूर्वी ग्रामसभेत ख्वाजानगर पोलीस चौकी ते नाझिम खतीब यांच्या घरापर्यंत गटार आणि रस्त्याचा प्रस्ताव पास करण्यात आला होता. ग्रामपंचायतीने निम्मा रस्ता आणि गटारीचे नविनिकरण केले. मात्र पुढील गटार निधी अभावी न बनवल्यामुळे सांडपाणी सोडण्यास जागा उरलेली नसल्या कारणाने सर्व दूषित पाणी रस्त्यावर येत होते. या रस्त्यातून वाट काडून रहिवाशांना चालावे लागत असे.

नागरिकांना रहदारीला अतिशय त्रास निर्माण होत होता. मी त्वरित माझ्या निधीतून ही गटारं आणि रस्ते तयार करून घेतली. मनोर परिसरातील उर्वरित रस्ते, गटार आणि टंचाईग्रस्त ठिकाणी पाणीपुरवण्याचे कामही हाती घेतले आहे. मनोरचे बसस्टँड नविनिकरण पंचायत समितीमार्फत करून घेतले आहे. उर्वरित विकास योजना देखील लवकरात लवकर पूर्ण करणार आहे.
– रंजना म्हसकर घोलप, सभापती, पंचायत समिती

मात्र कित्येक वर्षापासून रखडलेल्या गटारीचे काम वसंत चव्हाण यांच्या प्रयत्नाने पंचायत समिती सभापती रंजना म्हसकर यांच्या निधीतून गटारीसाठी तीन लाख आणि उर्वरित रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी दोन लाख असा निधीतून हा रस्ता आणि गटार बनवण्यात आले आहे.

मागील २५ वर्षांपूर्वी स्व. शकील रईस सरपंच असताना या रस्त्याचे काम केले होते. तेव्हापासून कोणीही या रस्ता-गटारीकडे लक्ष दिले नाही. दोन अडीच वर्षांपासून पाठपुरावा करून देखील ग्रामपंचायतीने दाद नाही घेतली. गटाराअभावी सांडपाण्यातून जावे लागत होते. पंचायत समितीने गटार आणि रस्त्याचे काम त्वरित केले म्हणून त्यांचे आभार.
– अब्दुल पठाण, नागरिक, ख्वाजा नगर

 

हेही वाचा –

‘पुन्हा चला नाहीतर पुढे चला’ हाच आपला मंत्र, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

First Published on: April 20, 2022 8:29 PM
Exit mobile version