अवैध रेती माफियांना महसूल विभागाच्या धक्का

अवैध रेती माफियांना महसूल विभागाच्या धक्का

भाईंदर :- मीरा -भाईंदर अपर तहसीलदार हद्दीत अवैध मार्गाने खाडीतील व समुद्रातील रेती सेक्शन पंपच्या साहाय्याने काढून रेती चोरून विकण्याचा सुळसुळाट सुरू असून त्याविरोधात कारवाई करत महसूल विभागाने घोडबंदर येथे करत १८० ब्रास रेती साठा उध्वस्त करत तो रेटीसाठा जेसीबीच्या साहाय्याने समुद्रात फेकून दिला आहे.समुद्रातील व खाडीतील अवैध मार्गाने बेसुमार रेती उपसा करून पर्यावरणाचा ह्रास करण्याचा गोरखधंदा रेती माफियांनी चालवला आहे. शासनाने वेळोवेळी चोरून रेती विकणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलली असली तरीही प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. ठाणे , पालघर, मीरा भाईंदरमध्ये अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला पेव फुटले आहे.

समुद्र किनार्‍यासह खाडीपात्रात बेसुमार उत्खनन (उपसा) सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी ठाणे व अपर तहसीलदार यांनी अवैध रेती प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. घोडबंदर खाडी पात्रात अवैध रेती (वाळू) उत्खनन आणि वाहतूक सुरू असून त्यावर कारवाई करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे व अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांनी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व यांना दिल्या होत्या. त्यानुसार मंडळ अधिकारी व तलाठी अभिजित बोडके, नितीन पिंगळे सह घोडबंदर येथील रेती बंदरात ३ एप्रिल रोजी छापा टाकला असता त्यांना अंदाजे १८० ब्रास रेतीसाठा सापडला. त्यांचा पंचनामा करत जेसीबी मशीनच्या साहाय्याने खाडी पात्रात ढकलून देऊन वाळूसाठा नष्ट करण्यात आला आहे.

First Published on: April 4, 2023 9:55 PM
Exit mobile version