विक्रमगड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना रखडली

विक्रमगड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना रखडली

विक्रमगड तालुक्यातील ओंदे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत खांड महसूल गावातील उघाणिपाडा-जनाठेपाडा पाणीपुरवठा नळ योजना तब्बल १२ वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे. या नळ योजनेकडे पाणीपुरवठा विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याचे निदर्शनास आल्याने जनतेकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी अपूर्ण योजनेकडे पूर्णतः पाठ फिरवली असल्याने या सर्व जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांविरूद्ध व नळ योजना अपूर्ण का?, असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या हालचालीला सुरूवात झाली आहे.

ग्रुप ग्रामपंचायत ओंदे हद्दीतील खांड-उघाणिपाडा, जनाठेपाडा लोकवस्तीच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने २०११-१२ साली ४५ लाख ९७ हजार ६५१ रूपयांची पाणीपुरवठा नळ योजना मंजूर करून या योजनेचे काम ओंदे ग्रामपंचायतीने ‘जागृती कंट्रक्शन’ या एजन्सीला दिले होते. या एजन्सीने योजनेतील पाण्याची विहीर व पाईपलाईन केली. तिही निकृष्ट दर्जाची होती. विहिरीत मोटार पंप बसवण्यात आला आहे. मात्र पाणीसाठा टाकी अपूर्ण अवस्थेत असल्याने येथील जनतेला या योजनेचा लाभ घेता येत नाही. पाण्यासाठी ग्रामपंचायतीने ५ टक्के पेसा निधी वापरून थोडी फार जनतेची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे.

ग्रामपंचायतीने ‘जागृती कंट्रक्शन’ या एजन्सीला ३८ लाख ४६ हजार रूपये अदा केले असूनही ही नळ योजना अपूर्ण अवस्थेत आहे. याप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने पूर्णतः गेली १२ वर्ष बघ्याची भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे. नळ योजना १२ वर्षापासून रखडली असल्याने शासनाचे एवढे पैसे खर्च करूनही योजना पूर्ण न केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एजन्सीने केलेल्या कामांचे मुल्यांकन कमी व रक्कम जास्त अदा केली असून उर्वरित रक्कम जिल्हा परिषदेकडे परत पाठवण्याचे सुचित केले आहे. तसेच ग्रामपंचायतीने हे पैसे परत न केल्याने या नळ योजनेला पुन्हा नवीन रेट नुसार मंजूरी मिळाली नसल्याने याला जबाबदार असलेल्या संबंधीतांविरूद्ध न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.

ओंदे ग्रामपंचायतीने जागृती कंट्रक्शन एजन्सीला अदा केलेली रक्कम –

एकूण अदा रक्कम – ३८,४६,००० रुपये

हेही वाचा –

विरोधकांच्या बहिष्कारापेक्षा गाजली मुख्यमंत्र्यांची चहापानासाठीची गैरहजेरी

First Published on: March 2, 2022 8:18 PM
Exit mobile version