इमारत उभी राहिली,शहरवासियांना लवकरच न्यायाची अपेक्षा

इमारत उभी राहिली,शहरवासियांना लवकरच न्यायाची अपेक्षा

भाईंदर :- मीरा -भाईंदरच्या न्यायालयाची इमारत बांधण्यात आली असून त्याची पाहणी करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या गौरी गोडसे आणि सत्र न्यायाधीश ठाणे हे ३ डिसेंबर रोजी शनिवारी दुपारी १ वाजता मीरा- भाईंदर शहरात न्यायालयाची बांधून पूर्ण असलेल्या इमारतीची पाहणी करणार आहेत. त्यावेळी पालिकेतील पालिका आयुक्त दिलीप ढोले हे सुद्धा पाहणी दरम्यान असणार आहेत. तर न्यायालय बहुदा २०२३ साली सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या मीरा- भाईंदर दिवाणी व फौजदारी न्यायालयाची ३ मजली इमारत बांधून तयार आहे. त्यात ६ न्यायदान कक्ष असणार आहेत. न्यायालयाची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. न्यायालय इमारतीच्या कामाचा पहिल्या टप्पात १२ कोटी ५० लाख इतका खर्च झाला आहे. तर दुसर्‍या टप्प्यासाठी ९ कोटींचा खर्च होता, असा एकूण २१ कोटीच्या घरात खर्च केला आहे. त्याचीच पाहणी करण्यासाठी न्यायमूर्ती दौरा करणार आहेत. मीरा -भाईंदर साठी स्वतंत्र न्यायालय व्हावे यासाठी अशी अनेक राजकीय नेत्यांनी मागणी केली होती, त्यावर मात्र शासनाने शासनाकडून आवश्यक परवानग्या घेण्यासाठी वेळ लागला पण शेवटी न्यायालयाची इमारत मात्र बांधली गेली आहे.

1) मीरा- भाईंदर शहरात १५ नंबर बसस्टॉप शेजारी असलेल्या जागेत नव्याने होणारे न्यायालयाची तीन मजली इमारत ही पूर्ण बांधून तयार आहे.

2) सजावटीचे व फर्निचर, लायटिंग, गॅस पाईपलाईन, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, अग्निशमन यंत्रणा, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही व नाला कव्हरिंग व अंतर्गत गटार बांधकाम व बगीचे उभारण्यासाठी सदरील शासन निर्णयद्वारे ह्यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

First Published on: December 2, 2022 9:19 PM
Exit mobile version