डोल्हारा स्मशानभूमीची दुरवस्था; ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला गावकरी कंटाळले

डोल्हारा स्मशानभूमीची दुरवस्था; ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला गावकरी कंटाळले

दुकानात पत्रे मिळत नसल्याने स्मशानभूमीच्या छतावर पत्रे टाकता येत नसल्याचे अजब कारण देत ग्रामपंचायतीने डोल्हारा स्मशानभूमीकडे दुर्लक्ष केल्याने स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायती अतिशय सावळागोंधळ आणि मनमानी कारभाराला गावकरी कंटाळले आहेत. ग्रामपंचायतच्या ह्या ढिसाळ कारभारामुळे स्मशानभूमीची दुर्दशा झालेली आहे. दुरुस्तीकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही, टाळाटाळ चालू आहे. त्यामुळे स्मशानाची अवस्था अतिशय खराब आणि बिकट झाली आहे.

पत्रे घेण्यासाठी सिमेंट पत्र्याचे दुकानामध्ये पत्रे शिल्लक नसल्यामुळे अजून स्मशानभूमीवर पत्रे टाकले नाहीत.
– एस. धुरंधर, ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय, डोल्हारा

स्मशानभूमीचे पत्रे तुटलेले आहेत. काही पत्रे हवेने उडून गेलेत आणि त्याचे अँगल देखील खराब झालेले आहेत. संरक्षण भिंतीचे काम देखील अपूर्ण स्थितीतच आहे. त्यामुळे मृत व्यक्तींवर अंतिमसंस्कार करायचे कसे?असा सवाल डोल्हारकरांना पडला आहे. सध्या पाऊसदेखील जोरदार पडत असल्याने स्मशानभूमीवर पत्रेच नसल्याने पावसाचे पाणी मृतदेहांवर आणि रचलेल्या लाकडावर पडत आहे. त्यामुळे चिता पेट घेऊ शकत नाही. यामुळे गावकऱयांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात चौदा वित्त,पंधरा वित्त,पेसा यांसारखे अनेक प्रकारचे निधी असतात. पण त्यानिधीचा वापर करावा कुठे करायचा हेच ग्रामपंचायतीला कळत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. २०२१-२२ च्या कामामध्ये स्मशानभूमी दुरुस्तीचा समावेश असल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले होते. परंतु अजूनही स्मशानभूमीचे काम अपूर्णच आहे. ह्या गोष्टींचा डोल्हारकरांना ग्रामपंचायतचा त्रास सहन करावा लागत आहे. गैरसोय करणाऱ्या संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी गावकरी करत आहे.

ज्ञानेश्वर पालवे – हे मोखाडा वार्ताहर आहेत 

हेही वाचा –

भाजप-मनसे युतीच्या हालचाली वाढल्या; उद्या चंद्रकांतदादा घेणार राज ठाकरेंची भेट

First Published on: August 6, 2021 12:45 AM
Exit mobile version