Photo : नभ उतरू आलं…ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाचा मुंबईकरांनी घेतला आनंद 

Photo : नभ उतरू आलं…ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाचा मुंबईकरांनी घेतला आनंद 

नभ उतरू आलं...ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाचा मुंबईकरांनी घेतला आनंद 

मान्सून शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. ते भाकीत आता खरे ठरताना दिसत असून मान्सून सक्रिय झाला आहे. दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत मान्सूनची हजेरी लागली आहे. मराठावाड्यातील काही सलग्न भागातही मान्सून सक्रिय झाला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील काही भागांतही ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. काही मुंबईकरांनी शिवाजी पार्क चौपाटीवर सायंकाळच्या वेळी या ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा आनंद घेतला. (छाया – दीपक साळवी) 

 

 

First Published on: June 5, 2021 9:58 PM
Exit mobile version