गोव्याचे ‘राज दैवत’ असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे आज लोकार्पण

गोव्याचे ‘राज दैवत’ असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे आज लोकार्पण

गोव्याचे ‘राज दैवत’ असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे आज लोकार्पण होणार असून याचं निमित्ताने शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोटो शेअर करत एक ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलंय की, “पोर्तुगिज तसेच बहामनी राजवटीत भारताचा देदीप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर, 1668 मध्ये आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिराची पुनर्बांधणी केली, ते गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर आज, 11 फेब्रुवारीपासून जीर्णोद्धारानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले होते आहे. गोव्याचे युवा आणि तडफदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतजी यांचे मी मनापासून आभार मानतो ! मला विशेष आनंद आनंद आहे की, या जीर्णोद्धाराचे काम मुंबईतील वास्तुसल्लागार राहुल चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाले. आपले वैभव जपण्याचा हा अतिशय गौरवास्पद क्षण आहे. गोव्याचे ‘राज दैवत’ असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे आज लोकार्पण होते आहे आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हस्ते. हा एक दुर्लभ योग आहे. महाराष्ट्र, गोवा आणि देशभरातील जनतेला मी यानिमित्त शुभेच्छा देतो!” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

First Published on: February 11, 2023 12:50 PM
Exit mobile version