भाजप-शिवसेनेची संभाजीनगरमधून सुरु होणार ‘सावरकर गौरव यात्रा’, राजकीय पक्षांचं मोठं शक्तिप्रदर्शन

भाजप-शिवसेनेची संभाजीनगरमधून सुरु होणार ‘सावरकर गौरव यात्रा’, राजकीय पक्षांचं मोठं शक्तिप्रदर्शन

Savarkar Gaurav Yatra

भाजप- शिवसेनेची ‘सावरकर गौरव यात्रा’ 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणार आहे. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापासून ते गणेश मंदिरापर्यत ही गौरव यात्रा काढली जाणार असल्याचे, राज्याचे केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही गौरव यात्रा 2 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता निघणार आहे. महाविकास आघाडीचीही 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट सभा होणार आहे. त्यामुळे रविवारी, राजकीय पक्षांचे मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

सावरकरांची गौरवगाथा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे, भाजप-शिवसेनेतर्फे राज्यभरातून वीर सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभदेखील संभाजीनगरधून 2 एप्रिल रोजी होणार आहे. शहरातील सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन संभाजीनगरमधील या यात्रेला प्रारंभ होणार आहे, असे केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राजकीय शक्तिप्रदर्शन होणार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील वातावरण चांगलंचं तापलेलं आहे. राम नवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागातील राम मंदिरासमोर झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीमुळे शहरातल्या शांततेला तडा गेला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असली तरीही दोन गटात राडा झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. उद्या संभाजीनगरमध्ये होणारी संयुक्त सभा आणि भाजपची गौरव यात्रा यामुळे राजकीय आरोप- प्रत्योरोप आणखी वाढण्याची शक्यता आहे. सावरकर गौरव यात्रा आणि मविआच्या सभेमधून जोरदार राजकीय प्रदर्शन केले जाणार आहे.

( हेही वाचा: श्रीकांत शिंदेंच्या नोकरांना सुरक्षा; मग संजय राऊतांना का नाही? सुनिल राऊतांचा सवाल )

मविआची विराट सभा

महाविकास आघाडी सरकारने भाजप- शिवसेना युती सरकारच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट सभेचे आयोजन केले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी महाविकास आघाडीने या संयुक्त सभेची घोषणा केली आहे. मविआच्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी 15 अटींवर दिली आहे. महाविकास आघाडीच्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.

First Published on: April 1, 2023 2:46 PM
Exit mobile version