ये दोस्ती हम नहीं तोडेंगे… एकनाथ शिंदेंनी पुण्यातील मित्राची रात्री उशिरा रुग्णालयात घेतली भेट

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे… एकनाथ शिंदेंनी पुण्यातील मित्राची रात्री उशिरा रुग्णालयात घेतली भेट

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० समर्थक आमदारांनी बंड पुकारल्याने शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून वारंवार शिंदे गटाचा उल्लेख विश्वासघाती आणि गद्दार असा केला जातो. पण दुसरीकडे धकाधकीच्या दिनक्रमातून मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मित्राच्या भेटीसाठी वेळ काढला आणि रात्री उशिरा पुण्यातील एका रुग्णालयात त्याची भेट घेतली.

शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या दारी पोहोचला आहे. त्यातच या वादाला हिंसक वळण देखील लागले आहे. पुण्यामध्ये शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काल रात्री भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली.

हेही वाचा – आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नका, उदय सामंतांचा हल्लेखोरांना इशारा

भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी असलेले गिरीश बापट हे सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात भाजपाचा प्रभाव वाढविण्यात त्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांसोबत गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. त्याच्या या भेटीची पोस्ट आणि फोटो गिरीश बापट यांनी फोसबुकवरून शेअर केला आहे.

गिरीश बापट म्हणतात…
माझे महाराष्ट्र विधिमंडळातील जुने सहकारी व मित्र मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे काल पुणे दौऱ्यावर आले होते. दिवसभर व्यग्र कार्यक्रम असतानाही आपल्या जुन्या सहकाऱ्यांना न विसरता, वेळात वेळ काढून रात्री उशिरा रुग्णालयात येऊन आवर्जून माझी भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी उदय सामंत, तानाजी सावंत, विजय शिवतारे, अजय भोसले, अनिल बाबर, बापू कोंडे, किरण साळी आदींनीही विचारपूस केली.

हेही वाचा – केदार दिघेंविरोधात बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

First Published on: August 3, 2022 10:06 AM
Exit mobile version