…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल; काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचे विधान

…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल; काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचे विधान

congress balasaheb thorat

राज्यातील सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायायलयात सुरु असतानाच, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एक मोठे विधान केले आहे.  जर सर्वोच्च न्यायालयाने त्या आमदारांना अपात्र ठरवले तर राज्यातील सरकार कोसळून राष्ट्रपती राजवट लागेल, असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय देईल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे, थोरात यावेळी म्हणाले.

काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटातील वादावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी यावेळी छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडी सभेची जय्यत तयारी सुरु असल्याचेही म्हटले आहे. या सभेसाठी लोक प्रचंड उत्सुक असून, या सभेला मोठी गर्दी होणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्याची आणि गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे, असे मत बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.

सभा विराट होणार 

छत्रपती संभाजीनगरमध्ये गालबोट लावण्याचा तर प्रयत्न नाही ना? जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याची काय आवश्यकता होती? हे हेतू पुरस्पर केले जाता आहे काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. मात्र, सभा तर होणारच. अत्यंत जोरदार आणि विराट सभा होणार आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडी ताकद राज्याला दिसणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा: संजय राऊत मूर्ख आणि मविआची सभा कॉमेडी शो; संजय शिरसाटांचे टीकास्त्र )

आधी मदत करा, मग देवदेव करा

अतिवृष्टी व गारपिटीने झालेल्या प्रंचड नुकसानीच्या भरपाईपोटी राज्य सरकार काय देणार हे अद्याप जाहीर झाले नाही. महाराष्ट्र हे कुटुंब समजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम ते कर्तव्य पार पाडावे, नंतर देवदेव करण्यास हरकत नसल्याचे, बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

असे केल्यास देशाची प्रगती खुंटते

राज्याच्या सद्य: स्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले विचार केवळ एका राज्यापुरते नाहीत, तर देश कुठे चालला आहे, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. धर्माचा ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने अवलंब करावा. मात्र,राजकारण आणि धर्म यांची सरमिसळ केल्यास देशाची प्रगती खुंटते, हे सर्वोच्च न्यायालयाने वक्तव्य असल्याचे ते म्हणाले.

First Published on: March 31, 2023 2:37 PM
Exit mobile version