शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम,अबाल-वृद्धांची तुफान गर्दी

शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम,अबाल-वृद्धांची तुफान गर्दी

कोल्हापुरात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर कोल्हापूर पोलिसांनी बंदी घातली आहे. गणेशोत्सव सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

साता-यातील भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गौतमी पाटील ही आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. खेड्यापाड्यांत तिच्या लावणीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. नुकतीच  भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अबाल- वृद्धांची तुफान गर्दी होती.

सातारा लोकसभा मतदारसंघातील कुडाल याठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या स्टेजवर नारळ वाढवून आमदार शिवेंद्रराजे यांनी कार्यक्रमाला सुरु केली. यानंतर शिवेंद्र राजे यांनी काही काळ कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि त्यानंतर ते लगेचच निघून गेले. सुमारे अडीच तास गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम सुरु होता.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाविषयी तंबी दिली होती. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणार आहे. महाराष्ट्राची काही परंपरा आहे. लावणी असो वा इतर कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे झाले पाहिजे. त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता कामा नये, असे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले.

गौतमीच्या लावणीची क्रेझ

गौतमीच्या कार्यक्रमांची दिवसेंदिवस क्रेझ वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी साता-यामध्ये चक्क पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी वडिलांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, हा कार्यक्रम इतर कार्यक्रमांपेक्षा वेगळा ठरला, कारण, या कार्यक्रमाला महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

( हेही वाचा: संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंची महिला आयोगात धाव )

गौतमी सोशल मीडियावरील एक प्रसिद्द चेहरा

गौतमी पाटील ही सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आहे. आपल्या डान्स आणि एक्सप्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर आहे. पाटलांचा बैलगाडा, मी करते तुम्हाला मुजरा या गौतमीच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. गौतमीची मीडियावर क्रेझ आहे. तिला इन्स्टाग्रामवर 702K फाॅलोवर्स आहेत.

First Published on: March 28, 2023 11:22 AM
Exit mobile version