‘त्यांनी आपली राजकीय उंची पाहून बोलावे’; रोहित पवारांनी नरेश मस्केंना सुनावले

‘त्यांनी आपली राजकीय उंची पाहून बोलावे’; रोहित पवारांनी नरेश मस्केंना सुनावले

rohit pawar

ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर टीका करतान मोठा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी अनेक फोन केले, असा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला. यानंतर आता रोहित पवार यांनी नरेश म्हस्के यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. नरेश म्हस्के यांनी आपली राजकीय उंची पाहून बोलावे, असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

नरेश म्हस्के यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब कधीही कळणार नाही. त्यामुळे त्यांनी तसा प्रयत्न करु नये, असा टोला रोहित पवार यांनी म्हस्केंना लगावला. रोहित पवार म्हणाले की, मी नरेश म्हस्के यांना कधीही भेटलेलो नाही. मी त्यांच्याबद्दल कधी काही ऐकलेलं नाही. फक्त एकच गोष्ट ऐकली आहे, त्यांना जेव्हा ठाण्याचा नगराध्यक्ष बनायचे होते. त्यावेळी आत ते ज्या पार्टीत आहेत त्या पार्टीतील नेत्यांनी विरोध केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगून त्यांना नगराध्यक्ष केले. आज ते ज्या पार्टीत आहेत, त्या पार्टीतील नेत्यांना विरोध करण्यासाठी नरेश म्हस्के काॅंग्रेसमध्येही जाणार होते. आता त्याच विरोध करणा-या नेत्यांची ते बाजू घेत आहेत, ही आश्चर्याची गोष्ट आहे, असे रोहित पवार म्हणाले. पुढे रोहित पवार म्हणाले की, नरेश म्हस्के यांनी आपली राजकीय उंची पाहावी आणि त्यानंतर विधाने करावीत. म्हस्केंना एकच सांगतो, त्यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब कधीही कळणार नाही, त्यामुळे त्यांनी तसा प्रयत्न करु नये.

( हेही वाचा: ‘तुम्ही जनहिताची कामे थांबवू शकत नाहीत’; शिंदे-फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाने सुनावले )

म्हस्केंचा गौप्यस्फोट काय?

नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर आरोप करताना म्हटले की, क्रिकेट कन्ट्रोल बोर्डाची निवडणूक होती. या निवडणुकीत रोहित पवार उमेदवार म्हणून उभे होते. आपण माहिती काढा, पवार कुटुंबातील कुठली व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते. अजित पवार, तुम्ही आधी आपलं बघा. आपलं घरातलं बघा. नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा.रोहित पवारांना पाडण्यासाठी आपण कोणाकोणाला फोन केले होते? कोणाल निरोप दिल होते? हे आधी सांगा, त्यानंतर आमच्यावर टीका करा, असे नरेश म्हस्के म्हणाले.

First Published on: March 31, 2023 6:09 PM
Exit mobile version