शरद पवारांची भेट घेतल्याची अफवा, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून खुलासा

शरद पवारांची भेट घेतल्याची अफवा, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून खुलासा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्याचे फोटोही सोशल व्हायरल झाले. परंतु ही केवळ अफवा असल्याचे मुख्यंमत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

सन 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर वेगाने राजकीय घडामोडी घडत होत्या. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केले. यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यानंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 39 आमदारांनी ‘उठाव’ केल्याने आघा़डी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे सरकार स्थापन झाले. पण हे सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात डिसेंबरपर्यंत मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत शरद पवार यांनी केले.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, असे वृत्त प्रसारित झाले. परंतु खुद्द एकनाथ शिंदे यांनी हे वृत्त फेटाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा – काहीही गैर केलेले नाही, निवडणुकीच्या आधीपासूनच युती, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट

First Published on: July 6, 2022 9:03 AM
Exit mobile version