अब सभी को सभी से खतरा हैं…, संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे चर्चा

अब सभी को सभी से खतरा हैं…, संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे चर्चा

मुंबई : राज्यात गेल्या महिन्याभरापासून शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना सर्वाधिक अडचणीत आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करताना, अब सभी को सभी से खतरा है…, असे म्हटले आहे. त्यामुळे विविध तर्क मांडले जात आहेत.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदारांनी ‘उठाव’ केला. तसेच, बहुतांश सर्वांनीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. राज्यसभा निवडणुकीत वेगळाच उमेदवार पडला, दुसरा पडायला पाहिजे होता, असे शिवसेना गोटात बोलले गेल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत म्हटले होते. याशिवाय, शिवसेना खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी, अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं…’ असे ट्वीट केले आहे. यातून वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहे.

हेही वाचा – ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

विशेष म्हणजे, संजय राऊत यांनी हे ट्वीट करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच प्रियंका गांधी यांनाही टॅग केले आहे. सकाळी पत्रकार परिषदेत याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले, भविष्यात कोणी कुणाला सुरक्षित समजू नये. राजकारणात प्रत्येकाच्या हातात खंजीर आहे. प्रत्येकाला प्रत्येकापासून खतरा आहे, असे मला वाटते.

तर दुसरीकडे, शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याच मुद्द्यावर शिवसेना खासदार बंडाचे निशाण फडकावण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता शिवसेनेने घेतलेल्या भूमिकमेमुळे फूट तूर्तास टळली असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – राज्यातील पूर परिस्थितीमुळे मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला, राज ठाकरेंचा निर्णय

First Published on: July 12, 2022 12:14 PM
Exit mobile version